एका क्षणात भारतीय जवान करतील शत्रूचा खात्मा; लडाखच्या सीमेवरुन थेट चीनला ऐकू गेली गर्जना

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2021 04:18 PM2021-09-03T16:18:07+5:302021-09-03T16:19:32+5:30

कमांडर लेफ्टनंट जनरल पीजीके मेनन यांनी पूर्व लडाखमध्ये एलएसीवर सराव घेत आक्रमकपणा दाखवणाऱ्या भारतीय जवानांसोबत संवाद साधला आणि त्यांचा उत्साह वाढवला.

India China Faceoff: Indian Army carries out live-fire exercise in Ladakh | एका क्षणात भारतीय जवान करतील शत्रूचा खात्मा; लडाखच्या सीमेवरुन थेट चीनला ऐकू गेली गर्जना

एका क्षणात भारतीय जवान करतील शत्रूचा खात्मा; लडाखच्या सीमेवरुन थेट चीनला ऐकू गेली गर्जना

Next
ठळक मुद्देभारत आणि चीन यांच्या सीमेवर मागील वर्षभरापासून वाद सुरु आहेत. चीनने लडाखच्या अक्साई चीन भागातील गलवान खोऱ्यात रस्ते बांधण्याचं काम हाती घेतलं. त्याला भारताने विरोध केला१५ जून रोजी लडाखच्या गलवान खोऱ्यात भारतीय जवान आणि चीनच्या सैनिकांमध्ये हिंसाचार घडला.

नवी दिल्ली – पूर्व लडाखमध्ये चीनसोबत(India-China Faceoff) सुरु असलेल्या सीमावादामुळे भारतीय सैन्याचे जवान नेहमी सतर्कता बाळगतात. कुठल्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी भारतीय जवान तयार असतात. जर वाईट हेतूनं शत्रू सीमा पार करण्याचा प्रयत्न करत असेल तर भारतीय जवान डोळे झपकताच त्यांचा खात्मा करतील. याच दरम्यान सैन्याच्या जवानांनी गुरुवार पूर्व लडाखमध्ये अभ्यास सराव करून स्वत:ची क्षमता दाखवली आणि शत्रूला मर्यादेत राहण्याचे संकेत दिले.

१५ हजार फूट उंचीवर सैन्याचा सराव

लडाखच्या सुरक्षेसाठी चीनच्या सीमेवर तैनात असलेल्या भारतीय लष्कराने(Indian Army) १५ हजार फूट उंचावर असलेल्या परिसरात टँकच्या माध्यमातून क्षमता दाखवली. यावेळी कमांडर लेफ्टनंट जनरल पीजीके मेनन सरावावेळी उपस्थित होते. सरावादरम्यान भारतीय जवानांनी टँक पूर्व लडाखमध्ये दिवसभर चालवले. लष्कराच्या स्नो लेपर्ड ब्रिगेडच्या टँकने लक्ष्यावर गोळे उडवून युद्ध लढण्याची त्यांची तयारी दाखवली. लष्कराच्या टी ९० भीष्म आणि टी ७२ अजय सारख्या टँकने सरावावेळी त्यांची मारक क्षमता दाखवली. ज्याची गर्जना सीमेपलीकडे असणाऱ्या चीनच्या सैन्यापर्यंत पोहचली.

Indian Army Practice in Ladakh

कमांडर लेफ्टनंट जनरल पीजीके मेनन यांनी पूर्व लडाखमध्ये एलएसीवर सराव घेत आक्रमकपणा दाखवणाऱ्या भारतीय जवानांसोबत संवाद साधला आणि त्यांचा उत्साह वाढवला. भारत आणि चीन यांच्या सीमेवर मागील वर्षभरापासून वाद सुरु आहेत. चीनने लडाखच्या अक्साई चीन भागातील गलवान खोऱ्यात रस्ते बांधण्याचं काम हाती घेतलं. त्याला भारताने विरोध केला. ५ मे २०२० रोजी भारतीय सैन्य आणि चीनी सैन्यात झटापट झाली. त्यानंतर चीन सैनिक ९ मे रोजी सिक्किमच्या नाथूला इथं एकमेकांना भिडले होते. यात अनेक सैनिक जखमी झाले होते. त्यानंतर १५ जून रोजी लडाखच्या गलवान खोऱ्यात भारतीय जवान आणि चीनच्या सैनिकांमध्ये हिंसाचार घडला. यावेळी झालेल्या हल्ल्यात भारताचे २० जवान शहीद झाले तर चीनचेही बरेच जवान मारले गेले. या झटापटीनंतर चीन आणि भारत यांच्यात तणावाचं वातावरण निर्माण झालं.

Indian Army Practice in Ladakh

चीनची आर्थिक नाडी भारतानं मोडली

भारत चीनसाठी मोठी बाजारपेठ आहे. चीनमध्ये तयार होणारी उत्पादनं मोठ्या प्रमाणात भारतात येतात. मात्र गेल्या काही महिन्यांत भारतानं चीनला मोठा झटका दिला आहे. चीनकडून होणारी निर्यात गेल्या काही महिन्यांत कमी झाली आहे. भारतानं चीनवर असलेलं अवलंबित्व कमी केलं आहे. त्याचा मोठा फटका चीनला बसला आहे. चीनच्या आर्थिक स्थितीवर याचा प्रतिकूल परिणाम दिसत आहे. चिनी उत्पादनांना असलेली मागणी घटली असून हीच परिस्थिती कायम राहण्याचा सीआयसीसीचा अंदाज आहे. सीआयसीसी चीनमधील गुंतवणूक बँक आहे. पुढील काही महिनेदेखील निर्यातीच्या आघाडीवर चीनला धक्के बसणार अशी शक्यता बँकेनं वर्तवली आहे.

Indian Army Practice in Ladakh

Web Title: India China Faceoff: Indian Army carries out live-fire exercise in Ladakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.