India-China बॉर्डरवरच्या भारतीय जवानाची देशवासीयांना साद; 30 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला Video  

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2020 10:33 AM2020-06-26T10:33:28+5:302020-06-26T10:34:36+5:30

भारत-चीन सीमेवर तणावाचे वातावरण असताना सोशल मीडियावर एक व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल झाला आहे.

India China FaceOff: Indian army personnel appeals indian to boycott china product video is going viral | India-China बॉर्डरवरच्या भारतीय जवानाची देशवासीयांना साद; 30 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला Video  

India-China बॉर्डरवरच्या भारतीय जवानाची देशवासीयांना साद; 30 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला Video  

googlenewsNext

India China FaceOff: भारत-चीन सीमेवर सध्या तणावाचं वातावरण आहे. गेल्या काही दिवसांपासून भारत-चीन सीमेवर अनेक हालचाली पाहायला मिळत आहेत. भारतानेही चीनला लागून असलेल्या 3488 किलोमीटरच्या नियंत्रण रेषेवर आपली ताकद वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. चीनही नियंत्रण रेषेवर सातत्यानं सैनिकांची संख्या वाढवत असल्याचे निदर्शनास आल्यामुळे भारतानेही त्यांनी तोडीसतोड उत्तर देण्याचा निर्णय घेतला आहे. भारत-चीन सीमेवर तणावाचे वातावरण असताना सोशल मीडियावर एक व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल झाला आहे. चीन बॉर्डरवर तैनात असलेल्या भारतीय जवानाचा हा व्हिडीओ आहे. त्यानं तेथील परिस्थितीचा आढावा देताना देशवासियांना एक आवाहन केलं आहे. हा व्हायरल व्हिडीओ 30 लाख लोकांनी पाहिला आहे.

राजीव जाखड या यूजरने फेसबुकवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यावर त्यानं लिहिलं की, ''मित्रांनो आपला भाऊ काय सांगतो ते नीट ऐका.'' या व्हिडीओतील जवान सांगतोय की,''हाय मित्रांनो.. आम्ही चीन बॉर्डवर चाललोय आणि अडथळ्यांवर मात करून आम्हाला तिथे पोहोचायचे आहे. या ठिकाणी आल्यानंतर रस्ता संपतो आणि त्यानंतर डोंगरदऱ्यातून रस्ता काढत आम्हाला पुढे जावं लागतं. या ट्रकमधून आम्ही जात आहोत.''

''तुम्ही सर्व मजेत राहा आणि आम्ही इथे देशासाठी शत्रूंशी लढतो. तुम्हीही एक काम करा यार...चिनी अॅप डिलीट करा आणि त्यांच्या वस्तूंवर बहिष्कार घाला. तुमच्या हृदयात देशभक्ती जागी करा. आम्ही पण येथे देशभक्त म्हणूनच लढत आहोत. एवढ्या खडतर परिस्थितीतही आम्ही इथे कर्तव्य बजावत आहोत. तुम्ही घरी बसून बोटांचा वापर करून चिनी वस्तूंवर बहिष्कार तर नक्की करू शकता. करा मित्रांनो, आम्हालाही बरं वाटेल. बाय...''

पाहा व्हिडीओ...

25 जूनला हा व्हिडीओ शेअर केला गेला आणि आतापर्यंत 3.1 मिलियन म्हणजेच 30 लाख वेळा तो पाहिला गेला आहे. त्याशिवाय 1 लाखहून अधिक लोकांनी तो शेअर केला आहे. 70 हजाराहून अधिका लाईक्स आणि रिअॅक्शन मिळाले आहे.  

Web Title: India China FaceOff: Indian army personnel appeals indian to boycott china product video is going viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.