India China Faceoff: ...म्हणून भारत चीनसोबत आरपारच्या लढाईच्या पर्यायासाठी तयार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2020 10:04 AM2020-06-29T10:04:07+5:302020-06-29T10:05:40+5:30

लडाखमधील वास्तविक नियंत्रण रेषेवरील सुरू असलेल्या संघर्षासंदर्भात मोदी सरकारच्या सर्वोच्च धोरणकर्त्यांमधील चर्चेसाठी 'संघर्ष आणि लढाई' हा शब्द वापरला गेला आहे.

India China Faceoff: ladakh standoff india considering military action and talks option with china | India China Faceoff: ...म्हणून भारत चीनसोबत आरपारच्या लढाईच्या पर्यायासाठी तयार

India China Faceoff: ...म्हणून भारत चीनसोबत आरपारच्या लढाईच्या पर्यायासाठी तयार

Next

नवी दिल्लीः लडाखमध्ये चीनसोबत सुरू असलेल्या लष्करी तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारच्या सर्वोच्च धोरणकर्त्यांमध्ये चीनला कशा पद्धतीनं धडा शिकवायचा यावर जवळपास एकमत झालेलं आहे. सीमेवरील वाद सोडविण्यासाठी चीनशी बोलणी सुरू ठेवली पाहिजे, असाही एक मतप्रवाह आहे. पण गरज पडल्यास भारतानं ड्रॅगनशी 'संघर्ष किंवा लढाई'साठी पूर्णपणे तयार असले पाहिजे, असंही काही जणांचं म्हणणं आहे. 
इंडियन एक्स्प्रेसच्या अहवालानुसार, लडाखमधील वास्तविक नियंत्रण रेषेवरील सुरू असलेल्या संघर्षासंदर्भात मोदी सरकारच्या सर्वोच्च धोरणकर्त्यांमधील चर्चेसाठी 'संघर्ष आणि लढाई' हा शब्द वापरला गेला आहे. या चर्चेत सामील असलेल्या उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले की, “आम्हाला संघर्ष वाढवायचा नाही, पण चीनपुढे गुडघे टेकून आम्ही कोणतीही तडजोड करणार नाही.”

आम्ही मागे हटणार नाही आणि आम्ही त्यांना सामोरे जाऊ, लष्करी कारवाईनंतर भारत सरकारने यावर विचार केला आहे का, असे विचारले असता ते म्हणाले, "जर आपल्याला या परिणामाची काळजी असेल तर आपण पुढे जाऊ शकणार नाही, असा सरकारचा विचार आहे. 20 भारतीय जवान शहीद झाल्यानंतर चीनच्या प्रतिक्रियेनंतर ड्रॅगनचा सीमेवरचा तणाव कमी करेल, असे वाटतं नाही. चीन जास्तच आक्रमक झाल्यानं आम्हीसुद्धा दुसऱ्या रणनीतीवर विचार करत आहोत. 

चीनच्या सैन्यानं आमच्या जवानांची हत्या केली. चीननं त्यांच्याबद्दल शोक व्यक्त करण्याची अपेक्षा करत नसलो तरी आमच्या सैन्याला ते जबाबदार धरत आहेत. त्यावरूनच बीजिंगचे मनसुबे स्पष्ट होतात. चीनसुद्धा सैन्य मागे घेतो, असं सांगत आहे, पण त्याची अंमलबजावणी करीत नाहीत. लडाखच्या सीमेवरील संघर्षाला भारताची चूक आणि सैन्य जमवाजमव जबाबदार असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. एप्रिलमध्ये चीनच्या सैन्य जमावाजमवीची पहिली बातमी उघडकीस आली, तेव्हा पेट्रोलिंग व पाळत ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. नंतर चिनी सैन्यांची संख्या सातत्याने वाढविण्यावरही त्याच प्रमाणात सैन्य केंद्रीकरण वाढवण्याचे निर्देश भारताला देण्यात आले. १९ जून रोजी सर्व पक्षांच्या बैठकीत ही माहिती दिल्याचंही त्यांनी सांगितलं. 

देशात चीनविरूद्ध लोक संतप्त 
चीनशी असलेले आर्थिक संबंध संपवण्याच्या प्रश्नावर दुसर्‍या एका वरिष्ठ अधिका-याने सांगितले की, चीनसोबतचे व्यापार संबंध लगेचच तोडणे शक्य नाही. पण भारताचा विकास हा चीनच्या संबंधांवर अवलंबून राहणार नाही, याची काळजी घेण्यात येणार आहे. चीनविरोधात देशात प्रचंड संताप आहे. देशाचे आर्थिक हितसंबंधही लक्षात ठेवले पाहिजेत. लष्करी व मुत्सद्दी दबाव वाढवण्याशिवाय भारताकडे पर्याय नाही, असंही त्यांनी सांगितलं. दुसर्‍या अधिका-याने सांगितले की, 'आज कोणीही युद्ध जिंकत नाही आणि सन २०२०चा भारत १९६२चा राहिलेला नाही. भारतानं प्रचंड जागतिक आघाडी घेतली आहे आणि आम्हाला त्याचा फायदा घ्यावा लागेल. आपल्या ताकदीद्वारे चीनला संपूर्ण प्रदेशात भीती निर्माण करायची आहे आणि स्वत: ला एक महाशक्ती म्हणून प्रस्थापित करायचे आहे. पण त्यांनाही चोख प्रत्युत्तर दिलं जाईल हे चीनने समजून घ्यायला हवे. 

हेही वाचा

पेट्रोल अन् डिझेलचे भाव पुन्हा भडकले, जाणून घ्या आजचे दर

CoronaVirus: कोरोनाची तीन नवीन लक्षणं आली समोर, CDCने अपडेट केली यादी

जवानांसोबतच्या चकमकीत ३ दहशतवाद्यांचा खात्मा, जून महिन्यातच ३८ अतिरेक्यांना केलं ठार

आजचे राशीभविष्य - 29 जून 2020; 'या' राशीच्या व्यक्तींना आज जीवनसाथी मिळणार

Read in English

Web Title: India China Faceoff: ladakh standoff india considering military action and talks option with china

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.