India China FaceOff: भारत-चीनच्या लष्करी अधिकाऱ्यांमध्ये १२ तास बैठक; भारतानं स्पष्ट शब्दांत सुनावलं

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2020 08:41 AM2020-06-23T08:41:25+5:302020-06-23T08:48:13+5:30

भारत-चीनमध्ये लेफ्टनंट जनरल स्तरावरील दुसरी बैठक 

India China faceoff Military Commanders Meeting At Lac Ends After Nearly 12 Hours | India China FaceOff: भारत-चीनच्या लष्करी अधिकाऱ्यांमध्ये १२ तास बैठक; भारतानं स्पष्ट शब्दांत सुनावलं

India China FaceOff: भारत-चीनच्या लष्करी अधिकाऱ्यांमध्ये १२ तास बैठक; भारतानं स्पष्ट शब्दांत सुनावलं

Next
ठळक मुद्देभारत-चीनच्या सैन्यात दुसऱ्यांदा लेफ्टनंट जनरल स्तरावरील बैठक१२ तासांच्या बैठकीनंतरही ठोस निर्णय नाहीसीमेवरील तणाव निवळण्याच्या हेतूनं चीनच्या मोल्डा भागात बैठक

नवी दिल्ली: प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी भारत आणि चीनमध्ये लेफ्टनंट जनरल स्तरावरील बैठक झाली. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या पलीकडे चीनच्या हद्दीत येणाऱ्या मोल्डो भागात ही बैठक पार पडली. तब्बल १२ तास चाललेल्या बैठकीनंतरही कोणत्याही ठोस गोष्टी घडल्या नाहीत.

भारत आणि चिनी सैन्यात गेल्या आठवड्यात गलवान भागात हिंसक झटापट झाली. त्यामुळे निर्माण झालेला तणाव कमी करण्यासाठी काल बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. याआधी ६ जूनला अशाच प्रकारची बैठक झाली होती. त्या बैठकीत सैन्य मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र चीननं पोस्ट हटवण्याचं आवाहन करणाऱ्या भारतीय जवानांवर हल्ला केला. भारतीय जवानांनाही चीनला चोख प्रत्युत्तर दिलं.

काल मोल्डोमध्ये सकाळी साडे अकरापासून लेफ्टनंट जनरल स्तरावरील बैठकीला सुरुवात झाली. मात्र १२ तासांनंतरही यातून ठोस काही हाती लागलं नाही. पूर्व लडाखमध्ये तैनात सैनिक मागे घेतले जावेत आणि ५ जूनच्या आधी असलेली परिस्थिती कायम ठेवावी, अशा मागण्या भारताकडून करण्यात आल्या. चीननं आपल्या सीमेवर परत जावं, असं भारताकडून स्पष्ट शब्दांत सांगण्यात आलं. 

मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून लडाखमध्ये भारत आणि चीनचे सैनिक आगनेसामने उभे ठाकले आहेत. त्यामुळे निर्माण झालेला तणाव निवळण्यासाठी ६ जूनला लेफ्टनंट जनरल स्तरावरील पहिली बैठक झाली. दोन्ही देशांचे सैनिक प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरून माघार घेतील, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला. या निर्णयाची अंमलबजावणी होतं आहे का, याची पाहणी करण्यासाठी भारतीय जवान १५ जूनला प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर गेले होते. त्यावेळी चिनी सैन्यानं कर्नल संतोष बाबू यांच्यावर हल्ला केला. त्यानंतर भारतीय जवानांनी चिनी सैन्याला जोरदार प्रत्युत्तर दिलं. या हिंसक झटापटीत भारताचे २० जवान शहीद झाले. तर चीननं आपले २० पेक्षा कमी जवान मृत्यूमुखी पडल्याचा दावा केला आहे.

नाद करा, पण आमचा कुठं! भारतीय जवानांनी थेट चिनी अधिकाऱ्याला उचललं

चीन युद्धाच्या तयारीत?; लडाखपासून अरुणाचल प्रदेशपर्यंत हवाई दलाच्या हालचाली

जुना मित्र कामी येणार; चीनला भिडणाऱ्या भारताला 'ब्रह्मास्त्र' देणार

Read in English

Web Title: India China faceoff Military Commanders Meeting At Lac Ends After Nearly 12 Hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.