India China Faceoff : मोदी सरकारनं चीनचा बदला घ्यावा, जवान शहीद झाल्यानं ओवैसी संतप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2020 05:52 PM2020-06-16T17:52:05+5:302020-06-16T18:08:34+5:30
India China Faceoff : राजकीय नेत्यांकडूनही भारतीय जवान शहीद झाल्यानं चीनचा बदला घेण्याची भाषा बोलली जात आहे.
नवी दिल्लीः भारत आणि चीनमध्ये पूर्व लडाखजवळच्या LACवरून वाद सुरू आहे. चिनी सैन्य आणि भारतीय लष्करामध्ये झालेल्या चकमकीत भारताचे तीन जवान आज शहीद झाले. त्यानंतर केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी संरक्षण सेवा प्रमुख (सीडीएस) जनरल बिपीन रावत यांच्यासह तीन सेना प्रमुखांची बैठक घेतली. आता राजकीय नेत्यांकडूनही भारतीय जवान शहीद झाल्यानं चीनचा बदला घेण्याची भाषा बोलली जात आहे.
लडाखच्या गलवानमध्ये चीनबरोबरच्या चकमकीत शहीद झालेल्या ३ योद्ध्यांबरोबर भारत उभा आहे. एक अधिकारी आणि दोन जवान शहीद झाले आहेत. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे. त्या जवानांचं बलिदान व्यर्थ जाता कामा नये, या हत्येचा सूड घेतला जावा, अशी प्रतिक्रिया एमआयएमचे असदुद्दीन ओवैसी यांनी दिली आहे.
दुसरीकडे सतत असे कृत्य करणाऱ्या चीनविरोधात भारत सरकारने कडक पावले उचलण्याची आता वेळ आली आहे, असे कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी म्हटले आहे.India stands with the 3 brave martyrs who were killed by China today in #Galwan. My thoughts are with families of Colonel & 2 brave soldiers. The commanding officer was leading from the front. The government must avenge these killings & ensure that their sacrifice was not in vain
— Asaduddin Owaisi (@asadowaisi) June 16, 2020
दरम्यान लडाखमधील गलवान घाटी परिसरातील गलवान खोऱ्यात आज भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये उडालेल्या हिंसक चकमकीत भारताच्या एका लष्करी अधिकाऱ्यासह अन्य दोन जवानांना वीरमरण आले आहे. तर चीनचे पाच सैनिक ठार झाल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, या झटापटीवेळी सीमारेषेवर गोळीबार झाला नसल्याची माहिती समोर आली आहे. भारत-चीन सीमेवर गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरू आहे. चीन सातत्याने असे म्हणत आहे की, हे प्रकरण चर्चेच्या माध्यमातून सोडवायचे आहे, परंतु सैन्य माघारी घेण्यास तयार नाही. चिनी सैनिकांना माघार घ्यावी लागेल, असे भारताने स्पष्ट केले होते. एलएसीवरील बदललेली परिस्थिती भारत कधीही स्वीकारणार नसल्याचंही मोदी सरकारनं स्पष्ट केलं होतं.
हेही वाचा
दौलत बेग ओल्डी : जगातील सर्वात उंचावरची हवाई पट्टी, चीनच्या डोळ्यात खुपतेय भारताची 'सर्वोच्च' शक्ती
...म्हणून भारत-चीनसाठी महत्त्वपूर्ण आहे गलवान खोरे, जिथे आज सैनिकांमध्ये झाली झटापट
CoronaVirus News: आजच्या घडीला मुंबईत यायची माझी हिंमत नाही, पण...; नितीन गडकरींची 'मन की बात'
आपत्तीत संधी! योगी आदित्यनाथ दीड लाख प्रवासी मजुरांना देणार जॉबचं ऑफर लेटर
CoronaVirus News: अमेरिकेनं मैत्री निभावली; भारताकडे १०० व्हेंटिलेटर्स सोपवली