India China FaceOff: आता चीनची नवी घुसखोरी; गलवान खोऱ्यातही ठोकले तंबू!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2020 06:24 AM2020-06-26T06:24:17+5:302020-06-26T06:24:39+5:30
भारताच्या दृष्टीने सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या दौलत बेग औल्डी येथील धावपट्टीच्या सुमारे ३० किमी आग्नेयेस वाय जंक्सन वा ‘बॉटलनेक’ म्हणून ओळखल्या जाणा-या ठिकाणापर्यंत चीनने सैन्यतुकड्या तैनात करण्याखेरीज चिलखती वाहने आणि खास लष्करी उपकरणेही आणली आहेत.
नवी दिल्ली : पूर्व लडाख सीमेवरील गलवान खोरे, हॉटस्प्रिंग व पॅनगाँग त्सो सरोवर या ठिकाणांवरील तणाव कमी करण्याचे प्रयत्न सुरू असतानाच चीनच्या सैन्याने उत्तरेकडील डेपसांग पठारावर घुसखोरी सुरू केली आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषा स्वत:च्या बाजूला खेचण्याचा चीनचा हा प्रयत्न आहे. ज्या गलवान खोºयात भारताच्या २० जवानांना हौतात्म्य पत्करावे लागले, तिथेही चीनने नवे बांधकाम सुरू केले आहे. सैन्यमाघारीची सहमती झाली असे सांगणारे चीन प्रत्यक्षात तिथे पाय घट्ट रोवण्याच्या तयारीत दिसत आहे. भारताच्या दृष्टीने सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या दौलत बेग औल्डी येथील धावपट्टीच्या सुमारे ३० किमी आग्नेयेस वाय जंक्सन वा ‘बॉटलनेक’ म्हणून ओळखल्या जाणा-या ठिकाणापर्यंत चीनने सैन्यतुकड्या तैनात करण्याखेरीज चिलखती वाहने आणि खास लष्करी उपकरणेही आणली आहेत.
लष्कराच्या प्रवक्त्याशी संपर्क साधला असता त्याने ‘अशा वृत्तास आम्ही दुजोरोही देणार नाही किंवा त्याचा इन्कारही करणार नाही,’ असे सांगितले.
तणावाच्या पार्श्वभूमीवर चिनी ब्रँड व उत्पादनांसाठी भारतीय बाजारांमध्ये आणखी अडचणी निर्माण होत आहेत.
>दावा भारताने फेटाळला
गलवान खोºयावर चीनने केलेला दावा भारताने पुन्हा ठामपणे फेटाळून लावला आणि दोन्ही देशांमध्ये झालेल्या सर्व करारांचे उल्लंघन करत चीनने मे महिन्यापासूनच सैन्य व युद्धसामुग्रीची मोठी जमवाजमव सुरु केल्यानेच गलवान खोºयातील संघर्ष घडला, अशी टीका केली. परराष्ट्र प्रवक्ते म्हणाले की, गलवान खोरे भारताचेच आहे व भारतीय सैन्य फार पूर्वीपासून तेथे आहे. सीमेवरील जी ‘जैसे थे’ परिस्थिती बदलण्याचा भारताने कधीही प्रयत्न केलेला नाही. चीनने मात्र तसे कधीही केलेले नाही.30 किमी आग्नेयेस वाय जंक्शन किंवा ‘बॉटलनेक’ म्हणून ओळखल्या जाणाºया ठिकाणापर्यंत चीनने मुसंडी मारली आहे. तेथे चीनने मोठ्या संख्येने सैन्यतुकड्या तैनात करण्याखेरीज चिलखती वाहने व लष्करी उपकरणेही आणली आहेत.
>जवानांच्या कार्यावर मर्यादा
‘बॉटलनेक’ हे ठिकाण प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपासून भारताच्या बाजूला १८ किमीवर आहे. तेथून लडाखमधील बुर्टसे हे गाव सात किमी ईशान्येस आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषा याहूनही पाच किमी पश्चिमेस आहे, असा चीनचा दावा आहे.
या ठिकाणाला ‘वाय जंक्शन’ म्हणतात. तेथून एक फाटा राखी नाल्याच्या बाजूने उत्तरेला ‘पॅट्रोलिंग पॉईंट १०’पर्यंत जातो,
तर दुसरा आग्नेयेस ‘पॅट्रोलिंग पॉर्इंट
१३’पर्यंत जातो. या १०, ११, ११ए, १२ व १३ या ‘पॅट्रोलिंग पॉर्इंट’वर गस्त घालण्यासाठी भारतीय सैन्याची गस्ती तुकड्या याच पायवाटांचा वापर करतात.
या १० ते १३ ‘पॅट्रोलिंग पॉर्इंट’पर्यंत चीनचा वावर सुरु झाला तर दौलत बेग ओल्डी धावपट्टी परिसरात गस्त घालण्याच्या भारतीय सैन्याच्या कार्यावर मर्यादा येऊ शकतील.
वाहनांचा रस्ता फक्त ‘बॉटलनेक’पर्यंतच जातो. एप्रिल २०१३ मध्येही चीनने या डेपसांग पठारावर तंबू ठोकले होते.
त्यावेळी दोन्ही बाजूंमध्ये तीन आठवडे तणातणी सुरु होती.
अखेर राजनैतिक पातळीवर वाटाघाटी होऊन स्थिती पूर्वपदावर आली होती.
>गलवान खोºयात चीनकडून सुरु असलेल्या नव्या बांधकामाची चित्रे अमेरिकेतील कंपनीने उपलब्ध केली असून, त्यांचा अन्वयार्थ आॅस्ट्रेलियातील सामरिक तज्ज्ञ नॅथन रुजर यांनी लावला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार गलवान नदीकाठच्या उंच कपारीच्या पायथ्याशी चीनने दोन ताजी बांधकामे केल्याचे दिसते.