India China FaceOff: 'ते' दोन तास महत्त्वाचे ठरले; अजित डोवालांनी लडाखमध्ये चीनला झुकवले
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2020 03:32 PM2020-07-06T15:32:07+5:302020-07-06T15:34:51+5:30
पंतप्रधान मोदींचे खास असलेल्या अजित डोवालांची रणनीती यशस्वी
नवी दिल्ली: लडाखमध्ये दोन महिन्यांपासून निर्माण झालेला तणाव निवळला आहे. चिनी सैन्य गलवानमधून २ किलोमीटर मागे गेलं आहे. चीन सरकारकडूनदेखील या वृत्ताला दुजोरा देण्यात आला आहे. पूर्व लडाखमधील अनेक पोस्टवरून चिनी सैन्यानं माघार घेतली असून भारतीय जवान परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवून आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून निर्माण झालेला तणाव कमी करण्यात सरकारला यश आल्याचं चित्र आहे. यामध्ये राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अत्यंत विश्वासू मानले जाणाऱ्या अजित डोवाल यांनी काल त्यांचे चिनी समकक्ष असलेल्या वांग यी यांच्यासोबत जवळपास दोन तास व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा केली. या दोघांमध्ये विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. त्यानंतर आज चिनी सैन्य दोन किलोमीटरपर्यंत मागे सरकलं. त्यामुळे डोवाल आणि वांग यी यांच्यातील चर्चा फलद्रूप ठरल्याचं म्हटलं जात आहे. डोवाल आणि वांग यी यांच्यातील चर्चा अतिशय सौहार्दपूर्ण होती, अशी माहिती सुत्रांनी दिली. भविष्यात पुन्हा गलवानसारखी घटना होऊ नये यासाठी शांतता राखण्याबद्दल दोघांनी चर्चा केली. या चर्चेचा परिणाम आज दिसला.
National Security Advisor (NSA) Ajit Doval held talks with Chinese Foreign Minister and State Councilor Wang Yi over video call yesterday. Sources say talks were held in a cordial and forward-looking manner pic.twitter.com/rDRf1LSM6A
— ANI (@ANI) July 6, 2020
गलवान खोऱ्यात दोन्ही देशांच्या सैन्यात १५ जूनला रक्तरंजित झटापट झाली. यामध्ये भारताचे २० जवान शहीद झाले. तर चीनचे ४० जवान मारले गेले. मात्र चीननं याबद्दलचा अधिकृत आकडा जाहीर केला नाही. रक्तरंजित संघर्षामुळे सीमेवरील तणाव आणखी वाढला. याच पार्श्वभूमीवर डोवाल यांनी वांग यी यांच्यासोबत काल चर्चा केली. त्यानंतर चीननं गलवान खोऱ्यातून सैन्य मागे घेण्याचा निर्णय घेतला. त्याआधी दोन्ही देशांमध्ये अनेकदा कमांडर दर्जाच्या बैठका झाल्या.
The focus of the conversation between NSA Ajit Doval & Chinese FM Wang Yi was the full and enduring restoration of peace and tranquillity and to work together to avoid such incidents in future: Sources https://t.co/pPhvCqGEwh
— ANI (@ANI) July 6, 2020
गेल्या काही दिवसांत भारतानं चीनला अतिशय आक्रमकपणे प्रत्युत्तर दिलं. सामरिक, आर्थिक आणि कूटनीती अशा सर्व आघाड्यांवर भारतानं आक्रमक पवित्रा घेतला. लडाखमधील सीमेवर मोठ्या प्रमाणात फौजफाटा तैनात करण्यात आला. खुद्द पंतप्रधान मोदींनी लेहला भेट दिली. याशिवाय चीनच्या ५९ ऍप्सवर बंदी घालत ड्रॅगनला दणका दिला. अमेरिका, ब्रिटन, फ्रान्ससारख्या देशांना भारताला पाठिंबा दिल्यानं चीनची कोंडी झाली. हा सर्व दबाव अखेर कामी आला.