India China FaceOff: मोदींच्या वक्तव्यांवरून राजकीय वादंग, काँग्रेसने उपस्थित केले सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2020 02:39 AM2020-06-21T02:39:05+5:302020-06-21T02:39:24+5:30

India China FaceOff: चीन विषयाचे तज्ज्ञ आणि राजकीय पक्ष आता मोदी यांच्या विश्वसनीयतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत आहेत..

India China FaceOff: Political controversy over Modi's statements, questions raised by Congress | India China FaceOff: मोदींच्या वक्तव्यांवरून राजकीय वादंग, काँग्रेसने उपस्थित केले सवाल

India China FaceOff: मोदींच्या वक्तव्यांवरून राजकीय वादंग, काँग्रेसने उपस्थित केले सवाल

Next

शीलेश शर्मा
नवी दिल्ली : लडाखमध्ये बाहेरील कोणत्याही व्यक्तीने घुसखोरी केलेली नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केल्यानंतर यावरून राजकीय वादंग निर्माण झाला आहे. चीन विषयाचे तज्ज्ञ आणि राजकीय पक्ष आता मोदी यांच्या विश्वसनीयतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत आहेत. राहुल गांधी यांनी प्रश्न उपस्थित करीत टष्ट्वीट केले आहे की, पंतप्रधान मोदी यांनी भारतीय हद्दीत चिनी अतिक्रमणासमोर समर्पण केले आहे. जर ती जमीन चीनची होती, तर आमचे सैनिक का शहीद झाले? ते कोणत्या ठिकाणी शहीद झाले?
माजी गृहमंत्री चिदम्बरम यांनी म्हटले आहे की, पंतप्रधान जे सांगतात ते खरे असले तरी ५-६ मे रोजी दोन्ही सैन्यांत संघर्ष का झाला? ५ मे ते ६ जूनपर्यंत भारतीय कमांडर चिनी कमांडरशी कोणत्या मुद्यांवर चर्चा करीत होते. जर चिनी सैन्य आपल्या हद्दीत घुसले नाही, तर परराष्ट्रमंत्री जयशंकर आणि परराष्ट्र मंत्रालयाने यथास्थिती ठेवण्याचे आवाहन का केले आहे? चिनी सैन्य मागे जात आहे, असे सरकारकडून सांगितले जात आहे. म्हणजे, ते आपल्याच सीमेवरून मागे जात आहे काय? दरम्यान, काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनीही मोदी यांच्या वक्तव्यावर व्यंग केले आणि गोरख पांडे यांची कविता टष्ट्वीट केली ‘राजा बोला रात है, रानी बोली रात है, मंत्री बोला रात है, संत्री बोला रात है, यह सुबह सुबह की बात है.’
>माजी परराष्ट्रमंत्री नटवर सिंह काय म्हणाले?
माजी परराष्ट्रमंत्री नटवर सिंह यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, चिनी सैनिक गलवान खोऱ्यात ज्या ठिकाणापर्यंत घुसले आहेत ते आता ती जागा रिकामी करणार नाहीत. चीन ज्या जागेवर ताबा मिळवितो ती जागा ते पुन्हा रिकामी करीत नाहीत. अक्साई चीनवर चीनने याच प्रकारे ताबा मिळविला आहे. भारत आजपर्यंत ती जागा परत मिळवू शकलेला नाही. गलवान खोºयात झालेल्या घटनेनंतर भारताकडून जी रणनीती वापरण्यात आली आहे, ती पाहता असे म्हणता येईल की, यामुळे मोदी यांच्या परराष्ट्र धोरणाला मोठा धक्का बसला आहे. माजी परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शीद यांनी म्हटले आहे की, मोदी सरकार ज्या प्रकारे दावे करीत आहे, त्यातून त्यांच्या परराष्ट्र धोरणाची जी समज आहे, त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. मोदी यांनी चीनची मानसिकता समजून घ्यावी आणि नंतर कारवाई करावी.

Web Title: India China FaceOff: Political controversy over Modi's statements, questions raised by Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.