India China FaceOff: चिनी खाद्यपदार्थांवर बंदीचे आवाहन प्रक्षोभक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2020 02:15 AM2020-06-21T02:15:53+5:302020-06-21T02:16:32+5:30
India China FaceOff: रामदास आठवले यांनी केलेले आवाहन प्रक्षोभक आहे, अशी टीका नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर केली आहे.
नवी दिल्ली : देशातील हॉटेलांमधून चिनी खाद्यपदार्थांची विक्री करण्यास बंदी घालावी, लोकांनी या खाद्यपदार्थांवर बहिष्कार घालावा, असे केंद्रीय समाजकल्याण खात्याचे राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलेले आवाहन प्रक्षोभक आहे, अशी टीका नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर केली आहे. लडाखमधील गलवान खोºयात चिनी लष्कराशी झालेल्या चकमकीत भारताचे २० जवान शहीद झाले होते. त्या पार्श्वभूमीवर रामदास आठवले यांनी हे वक्तव्य केले होते.
व्हेज, नॉनव्हेज मंचुरियन राईस, गोबी मंचुरियन असे अनेक चिनी पदार्थ खवय्यांच्या जिभेचे चोचले पुरवत असतात. आठवले यांच्या वक्तव्याबद्दल काही नेटकऱ्यांनी टिष्ट्वटरवर म्हटले आहे की, देशातील हॉटेलामध्ये मिळणारे चिनी खाद्यपदार्थ खरेतर भारतीय पद्धतीने बनविले जातात. या खाद्यपदार्थांवर बंदी घातल्यास, ते बनविण्यासाठी राबणारे हजारो हात बेकार होतील. देशाच्या अर्थव्यवस्थेला कोरोनाच्या साथीमुळे मोठा फटका
बसला आहे. त्यातच असे निर्णय घेतले तर बेरोजगारांचेही प्रमाण वाढेल. पत्रकार मोहम्मद झुबैर यांनी एका टिष्ट्वटमध्ये म्हटले आहे की, चिनी खाद्यपदार्थांची बहुतांश हॉटेल ईशान्य भारतातील लोकांकडून चालविली जातात किंवा हॉटेलात हे खाद्यपदार्थ बनविणाºयांंमध्ये त्या लोकांचे प्रमाण मोठे आहे. चिनी खाद्यपदार्थांवर बंदी घाला हे केंद्रीय समाजकल्याण खात्याचे राज्यमंत्री रामदास आठवले यांचे विधान अतिशय धोकादायक आहे. अशा विधानांमुळे चिनी खाद्यपदार्थ विकणारे किंवा ते बनविणाºयांवर हल्लेही होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
>कोरोनाची साथ सुरू झाल्यानंतर रामदास आठवले यांनी केलेली ‘गो कोरोना गो’ ही घोषणा देशभरात चर्चेचा विषय बनली होती. त्यानंतर आता आठवले यांनी चिनी खाद्यपदार्थांच्या विरोधात मोर्चा उघडला आहे. लेखक सिद्धार्थ सिंह यांनी म्हटले आहे की, देशातील अनेकांच्या हातांना सध्या काम नाही. त्यामुळे अशा बेकारांचे तांडे चिनी खाद्यपदार्थ विकणाºया हॉटेलांवर किंवा रस्त्यावर त्या खाद्यपदार्थांची गाडी चालविण्यावर हल्लेही करू शकतात.
>धोकादायक विधाने चुकीची
चिनी खाद्यपदार्थांवर बंदी घाला हे केंद्रीय समाजकल्याण खात्याचे राज्यमंत्री रामदास आठवले यांचे विधान अतिशय धोकादायक आहे. अशा विधानांमुळे चिनी खाद्यपदार्थ विकणारे किंवा ते बनविणाºयांवर हल्लेही होण्याची शक्यता नाकारता येत नाही.