India China Faceoff : शहीद जवानाच्या आईला अश्रू अनावर; म्हणाली 'माझा मुलगा मला परत द्या'

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2020 04:29 PM2020-06-17T16:29:11+5:302020-06-17T16:59:22+5:30

India China Faceoff : चीन सैन्याशी दोन हात करणाऱ्या 20 शहीद जवानांची नावे जवानांची नावं प्रसिद्ध करण्यात आली आहे.

India China Faceoff rajesh orang martyred of birbhum west bengal | India China Faceoff : शहीद जवानाच्या आईला अश्रू अनावर; म्हणाली 'माझा मुलगा मला परत द्या'

India China Faceoff : शहीद जवानाच्या आईला अश्रू अनावर; म्हणाली 'माझा मुलगा मला परत द्या'

googlenewsNext

नवी दिल्ली – भारत आणि चीन सैनिकांमध्ये गलवान खोऱ्यात संघर्ष झाला. भारतीय सीमेवरील गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांनी हल्ल्यात भारताच्या एका कर्नलसह तीन जवान शहीद झाले. चीन सैन्याशी दोन हात करणाऱ्या 20 शहीद जवानांची नावे जवानांची नावं प्रसिद्ध करण्यात आली आहे. पश्चिम बंगालच्या बीरभूममधील राजेश ओरंग हे देखील शहीद झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांचं कुटुंब त्यांची आतुरतेने वाट पाहत होतं. मात्र आता शहीद राजेश यांचं पार्थिव घरी येणार आहे. गेल्या महिन्यात ते आपल्या घरी येणार होते. मात्र लॉकडाऊनमुळे ते शक्य झाले नाही. 

आपल्या मुलगा शहीद झाल्याचं समजल्यावर राजेश यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. राजेश ओरंग यांच्या घरची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. वडील आजारी असल्याने ते काम करू शकत नाहीत. एक बहीण आणि आई असून हे संपूर्ण कुटुंब राजेश यांच्यावरच अवलंबून होतं. राजेश यांच्या निधनाची बातमी ऐकल्यावर त्यांच्या आईला अश्रू अनावर झाले असून त्यांनी 'माझा मुलगा मला परत द्या' असं म्हटलं आहे. राजेश यांच्यावर घरची संपूर्ण जबाबदारी होती त्यांच्या जाण्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. 

राजेश ओरंग बिहार रेजिमेंटमध्ये तैनात होते. चीनसोबत झालेल्या संघर्षात ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र याच दरम्यान ते शहीद झाल्याची माहिती कुटुंबियांना देण्यात आली आहे. राजेश यांच्या भावाने दिलेल्या माहितीनुसार, ते गेल्या महिन्यांत घरी येणार होते. मात्र लॉकडाऊनमुळे ते आले नाहीत. राजेश यांचं लग्न देखील ठरवण्यात आलं होतं. ते गावी परत आल्यावर त्यांचं लग्न होणार होतं. मात्र त्याआधीच ते शहीद झाल्याचं समजलं. 

राजेश यांच्या कुटुंबात ते कमवणारे एकटेच असल्याने त्यांच्या आईने आपला मुलगा परत द्या असं म्हटलं आहे. घरची जबाबदारी घेणारं कोणीच नसल्याने राजेश यांच्या नातेवाईकांनी सरकारला मदत करावी अशी विनंती केली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. तेलंगणातील कर्नल संतोष बाबू हे देखील शहीद झाले आहेत. देशासाठी मुलाने आपल्या प्राणाचे बलिदान दिले, मला त्याचा अभिमान आहे अशी भावना संतोष यांच्या आईने व्यक्त केली आहे. तसेच आपला एकुलता एक मुलगा आता कधीच परत येणार नाही या गोष्टीचं दु:ख देखील असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

बापरे! मिठाईवरून लग्नात तुफान राडा; नवरदेवाने केली थेट नवरीच्या भावाची हत्या अन्...

CoronaVirus News : श्रद्धा की अंधश्रद्धा? ...म्हणून 'या' नदीत लोक रोज टाकताहेत तब्बल 500 किलो बर्फ

CoronaVirus News : विमानाने आलेल्या 'त्या' तरुणीमुळे प्रशासन धास्तावलं, तब्बल 96 जणांचा जीव धोक्यात

CoronaVirus News : तंत्रज्ञानाची किमया! रुग्णाजवळ न जाताच 'हे' भन्नाट उपकरण कोरोना योद्ध्यांना माहिती देणार

एकीकडे चीन तर दुसरीकडे कोरोना; मोदी सरकारसमोर आहेत 'ही' 5 मोठी आव्हानं

CoronaVirus News : कोरोनाचा धोका वाढतोय; आता देशात दररोज तब्बल 3 लाख लोकांची होणार चाचणी

India China Faceoff: "लहानसहान गोष्टींवर ट्विट करणारे पंतप्रधान शहिदांबद्दल चकार शब्दही काढायला तयार नाहीत"

India China Faceoff : 'मुलाचा अभिमान आहे पण 'या' गोष्टीचं दु:ख'; शहीद कर्नल यांच्या आईने व्यक्त केल्या भावना


 

Web Title: India China Faceoff rajesh orang martyred of birbhum west bengal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.