India China FaceOff: काय आहे सीमावाद? LAC, LOC आणि आंतरराष्ट्रीय सीमा यातील फरक समजून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2020 10:46 PM2020-06-20T22:46:54+5:302020-06-20T22:47:34+5:30

भारत, चीन आणि पाकिस्तान यांच्यातील सीमावाद नक्की काय आहे हे जाणून घ्या

India China FaceOff: Read LAC, LOC and International Boundaries to know border disputes | India China FaceOff: काय आहे सीमावाद? LAC, LOC आणि आंतरराष्ट्रीय सीमा यातील फरक समजून घ्या

India China FaceOff: काय आहे सीमावाद? LAC, LOC आणि आंतरराष्ट्रीय सीमा यातील फरक समजून घ्या

Next

प्रविण मरगळे

नवी दिल्ली - कधी चीनबरोबर एलएसीवरुन भारताचा वाद तर कधी पाकिस्तानशी एलओसीचा वाद. या वादाचे मूळ समजून घेण्यासाठी आपल्यास देशाच्या सीमांबद्दलही थोडेसे ज्ञान असणे आवश्यक आहे. आपल्या देशाच्या सीमा तीन प्रकारे विभागल्या आहेत हे आपल्याला माहिती आहे का? या सीमांना एलओसी, एलएसी आणि आंतरराष्ट्रीय सीमा म्हणतात. या तिघांमध्ये काय फरक आहे आणि शेजारी देशांबद्दल याबद्दल नेहमीच विवाद का होतात हे जाणून घेऊया.

आंतरराष्ट्रीय सीमा ही कोणत्याही देशाची सीमा आहे जी इतर शेजारच्या देशांना ती स्पष्टपणे विभक्त करते. आंतरराष्ट्रीय सीमा रेडक्लिफ लाइनवर स्थित आहे. त्याला आंतरराष्ट्रीय सीमा म्हणतात कारण ही सीमा जगभरातून याला मंजूर मिळालेली असते. म्हणजे, ही एक स्पष्ट सीमा आहे, ज्यावर कोणत्याही शेजारच्या देशाशी वाद नाही. भारताची आंतरराष्ट्रीय सीमा गुजरातच्या समुद्रापासून सुरु होऊन राजस्थान, पंजाब आणि जम्मूपर्यंत जाते. आंतरराष्ट्रीय सीमा पाकिस्तानच्या चार प्रांतांपासून भारताला वेगळे करते. काश्मीर, वाघा, भारत आणि पाकिस्तानचा पंजाब विभाग हे प्रांत आहेत. भारत आणि पाकिस्तान व्यतिरिक्त देशाच्या आंतरराष्ट्रीय सीमादेखील म्यानमार, बांगलादेश आणि भूतानसोबतही आहेत.

नियंत्रण रेषा(LOC)

नियंत्रण रेषा किंवा लाइन ऑफ कंट्रोल ही दोन देशांमधील सैन्य करारांनुसार अधिकृतपणे तडजोड केलेली सीमा आहे. आंतरराष्ट्रीय समुदाय याला मानत नाही. भारत आणि पाकिस्तान दरम्यानच्या सध्याच्या सीमेला नियंत्रण रेषा म्हणतात. १९४७ मध्ये संपूर्ण काश्मीर भारताचा भाग होता त्यावेळी भारत आणि पाकिस्तानची फाळणी झाली. १९४८  मध्ये सुरू असलेल्या सीमा विवाद लक्षात घेता दोन्ही देशांनी परस्पर करार करून नियंत्रण रेखा निश्चित केली होती. असे असूनही पाकिस्तानने कुरापती करणं सोडलं नाही आणि १९७१ मध्ये त्याने काश्मीरचा एक मोठा भाग बेकायदेशीरपणे ताब्यात घेतला, जो आता पाकव्याप्त काश्मीर म्हणून ओळखला जातो. हे युद्ध १९७२ मध्ये भारत-पाक सिमला करारा नंतर झाले, ज्यामध्ये दोन्ही बाजूंच्या सैन्याने नकाशावर नियंत्रण रेखा (एलओसी) लावली. मात्र ही अधिकृत सीमा नाही. एलओसी हा लष्करी नियंत्रणाचा एक भाग आहे, या वादग्रस्त भागापासून दूर राहण्याचा निर्धार आहे.

वास्तविक नियंत्रण रेखा (LAC)

वास्तविक नियंत्रण रेखा( लाइन ऑफ एक्चुअल कंट्रोल) ही एलओसीपेक्षा भिन्न आहे. भारत आणि चीनमध्ये ४ हजार ५७ किमी लांबीच्या सीमेला वास्तविक नियंत्रण (एलएसी) म्हणतात. दोन्ही देशांमधील एलएसी लडाख, जम्मू-काश्मीर, उत्तराखंड, हिमाचल, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश या भारतीय राज्यांमधून जाते. एलओसीप्रमाणे हा दोन देशांनी केलेला युद्धविराम रेषा आहे. या दोघांमधील फरक असा आहे की, एलओसी स्पष्टपणे नकाशावर परिभाषित केले गेले आहे, परंतु एलएसीची कोणतीही स्पष्ट किंवा अधिकृत व्याख्या नाही. हेच कारण आहे की याबद्दल नेहमीच वाद असतात. १९६२ च्या युद्धानंतर चिनी सैन्य तेथे अस्तित्त्वात होते, तेव्हा त्याला वास्तविक नियंत्रण रेखा (एलएसी) म्हणून स्वीकारले गेले. या युद्धामध्ये चीनने भारताच्या कार्यक्षेत्रातील अक्साई चीन ताब्यात घेतला. हेच कारण आहे की, आंतरराष्ट्रीय समुदाय एलएसीचा मानत नाहीत.

कारगिल युद्धाचे नायक शहीद कॅप्टन विजयंत थापर यांचे वडील कर्नल व्ही.एन. थापर यांच्या मते, ब्रिटिशांच्या काळात त्यांनी भारत आणि चीनमधील सीमा निश्चित केली, ज्याला मॅकमोहन लाइन म्हणून ओळखले जाते. त्याअंतर्गत अक्साई चीन हा भारताचा भाग होता. परंतु धोकेबाज चीन आता मॅकमोहन लाईन मानत नाही. १९६२ च्या युद्धामध्ये त्यांनी भारताची भूमी ताब्यात घेतली. तोपर्यंत गलवान खोऱ्यासह संपूर्ण परिसर हा भारताचा भाग होता. चीन आता या गलवान खोऱ्यावर आपला दावा सांगत आहे.

Web Title: India China FaceOff: Read LAC, LOC and International Boundaries to know border disputes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.