India China Faceoff: ...तर आम्ही चोख प्रत्युत्तर देण्यात सक्षम, पंतप्रधान मोदींनी थेट चीनला दिला इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2020 03:17 PM2020-06-17T15:17:59+5:302020-06-17T16:08:27+5:30
भारत हा शांतीपूर्ण देश आहे. आपल्या जवानांचं बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही.
नवी दिल्लीः भारत हा शांतीपूर्ण देश आहे. आपल्या जवानांचं बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही. भारतानं कधीच कोणावर आक्रमण केलेलं नाही. आम्ही चोख प्रत्युत्तर देण्यात सक्षम आहोत. शहीद झालेल्या जवानांनाही गर्व असेल की, त्यांना संघर्षात वीरमरण आलं आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांनी जनतेशी संवाद साधला आहे. मोदींनी शहिदांना दोन मिनिटे उभे राहून श्रद्धांजलीही अर्पण केली आहे.
आम्ही नेहमीच शेजाऱ्यांबरोबर को-ऑपरेटिव्ह आणि फ्रेंडली पद्धतीनं काम केलं आहे. नेहमीच त्यांच्या विकास आणि कल्याणाची इच्छा केली आहे. जिथे मतभेद असतील तेसुद्धा आम्ही सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. जेणेकरून मतभेद राहू नयेत. मतभेद वादामध्ये बदलू नये. आम्ही कधीच कोणाला उकसवलं नाही. तसेच आम्ही देशाची अखंडता आणि सार्वभौमत्वाशी कोणतीही तडजोड करणार नाही. जेव्हा कधी वेळ आली तेव्हा आम्ही देशाची अखंडता आणि सार्वभौमत्वाचं संरक्षण करण्यासाठी शक्तीचं प्रदर्शन केलं आहे. आपले जवान मारता मारता शहीद झाले आहेत याचा देशाला अभिमान आहे. आमच्या क्षमता वेळोवेळी आम्ही सिद्ध केलेल्या आहेत. त्याग हे आमच्या राष्ट्रीय चारित्र्याचा भाग आहे. त्याचबरोबर विक्रम आणि वीरतासुद्धा आमच्या देशाच्या चारित्र्याचा भाग आहे, असंही मोदी म्हणाले आहेत.
आमच्या जवानांचं बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही. भारताची अखंडता आणि सार्वभौमत्वाशी कोणालाही छेडछाड करू देणार नाही, यासंदर्भात कोणालाही संभ्रम असण्याचं कारण नाही. भारताला शांती हवी आहे. पण जर भारताला संघर्षासाठी उकसवल्यास चोख प्रत्युत्तर देण्यात सक्षम आहे, असंही मोदी म्हणाले आहेत.Delhi: PM Narendra Modi, Union Home Minister Amit Shah and the chief ministers of 15 states and union territories, who are present in the meeting via video-conferencing today, observe two-minute silence as a tribute to the soldiers who lost their lives in #GalwanValley clash. pic.twitter.com/R9smyDFwbR
— ANI (@ANI) June 17, 2020
दरम्यान, भारत-चीन सीमेवर हौतात्म्य आलेल्या आपल्या 20 जवानांची नावे आज जाहीर करण्यात आली आहेत. चिनी सैन्यासोबत झालेल्या चकमकीत या जवानांना हौतात्म्य आले आहे. ही घटना 15-16 जूनदरम्यानच्या रात्री घडली होती. भारतीय सैनिकांचे पथक कमांडिंग ऑफिसर कर्नल संतोष बाबू यांच्या नेतृत्वात चिनी कॅम्पमध्ये गेले होते. त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचे शस्त्र नव्हते. हे पथक चिनी सैन्याच्या मागे हटण्याच्या मुद्यावर झालेल्या सहमतीसंदर्भात बोलणी करण्यासाठी गेले होते. मात्र, तेथे भारतीय जवानांना चिनी सैनिकांनी दगा दिला. दगड, काटेरी तारा आणि खिळे असलेल्या काठ्यांनी चिनी सैनिकांनी या पथकावर हल्ला केला. यात कमांडिग ऑफिसर कर्नल संतोष बाबू आणि दोन जवान तेथेच शहीद झाले.#WATCH India wants peace but when instigated, India is capable of giving a befitting reply, be it any kind of situation: Prime Minister Narendra Modi pic.twitter.com/rJc0STCwBM
— ANI (@ANI) June 17, 2020
हेही वाचा
India China Faceoff: भारत-चीन सैन्यातील हिंसक झटापटीनंतर पंतप्रधान मोदींनी बोलावली सर्वपक्षीय बैठक
India China Faceoff: मोदीजी बाहेर या, कुठे लपून बसला आहात?, राहुल गांधींचा हल्लाबोल
CoronaVirus News : आरोग्य कर्मचाऱ्यांना वेळेत वेतन द्या, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
CoronaVirus News: "अखेर सत्य पुढे आलेच"; कोरोनाबळींचा आकडा वाढला, फडणवीसांनी सरकारवर निशाणा साधला!
CoronaVirus: डॉक्टरांच्या लढ्याला मोठं यश! 'या' औषधानं व्हेंटिलेटरवरचे रुग्णही झाले ठणठणीत
India China Faceoff : मोदी सरकारनं चीनचा बदला घ्यावा, जवान शहीद झाल्यानं ओवैसी संतप्त
दौलत बेग ओल्डी : जगातील सर्वात उंचावरची हवाई पट्टी, चीनच्या डोळ्यात खुपतेय भारताची 'सर्वोच्च' शक्ती