लडाखमधील तणाव निवळण्यासाठी भारत-चीनमध्ये ५ सूत्री कार्यक्रमावर सहमती, सैन्यमाघारीबाबतही झाला मोठा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2020 07:46 AM2020-09-11T07:46:10+5:302020-09-11T08:55:03+5:30
भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांच्यात झालेल्या चर्चेमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील तणाव निवळण्यासाठी पाच सूत्री कार्यक्रमावर सहमती झाली आहेत.
मॉस्को/नवी दिल्ली - चिनी सैन्याने केलेला घुसखोरीचा प्रयत्न आणि प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर समोरासमोर आलेले भारत आणि चीनचे सैन्य यामुळे लडाखमध्ये निर्माण झालेला तणाव आता निवळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. लडाखमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत आणि चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांमध्ये मॉस्को येथे सुमारे अडीच तास चर्चा झाली. भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांच्यात झालेल्या चर्चेमध्ये तणाव निवळण्यासाठी पाच सूत्री कार्यक्रमावर सहमती झाली आहेत. तसेच चर्चा चालू ठेवून सैनिकांना हटवण्याच्या प्रक्रियेला गती देण्याबाबतही दोन्ही देशांमध्ये एकमत झाले आहे.
लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर निर्माण झालेले तणावपूर्ण वातावरण निवळण्यासाठी आणि सैन्य हटवण्याबाबत निर्णय घेण्यासाठी भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि चिनी परराष्ट्रमंत्री वांग यी यांच्यामध्ये सुमारे अडीच तास चर्चा झाली. या चर्चेमध्ये भारत आणि चीनमधील संबंध विकसित करण्यासाठी दोन्ही देशांतील नेत्यांनी सर्वसहमतीच्यामाध्यमातून काम केले पाहिजे. तसेच परस्परांमधील मतभेदांना विवादाचे रूप देता कामा नये, या मुद्द्यावर सहमती व्यक्त केली आहे.
India, China reached five-point consensus after talks, says Chinese foreign ministry
— ANI Digital (@ani_digital) September 10, 2020
Read @ANI Story | https://t.co/aUpNtD1kErpic.twitter.com/O1O2P84IaY
याबाबत परराष्ट्र मंत्रालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या संयुक्त निवेदनामध्ये सांगण्यात आले की, दोन्ही परराष्ट्रमंत्र्यांनी भारत आणि चीनच्या सीमाभागासोबतच भारत आणि चीनमधील संबंधांमध्ये गेल्या काही काळात घडलेल्या घटनांवर स्पष्ट आणि रचनात्मक चर्चा केली. परस्पर संवाद चालू राहिला पाहिजे. तसेच प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरून सैनिकांना लवकरात लवकर मागे घेण्याच्या प्रक्रियेला गती दिली पाहिजे, यावर दोन्ही देशांमध्ये एकमत झाले आहे. योग्य अंतर राखून तणाव कमी करण्याच्या दिशेने काम केले पाहिजे, असेही या चर्चेत निश्चित झाले.
During the meeting, it was also emphasized that the Indian troops had scrupulously followed all agreements and protocols pertaining to the management of the border areas: Govt sources https://t.co/vKZo6nYHjZ
— ANI (@ANI) September 10, 2020
एकीकडे दोन्ही देशांचे सैन्य आमनेसामने येऊन प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर गोळीबार आणि झटापटीसारख्या घटना घडत असताना या चर्चेच्या माध्यमातून झालेले निर्णय महत्त्वपूर्ण मानण्यात येत आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या
शेतकऱ्यांसाठी सरकारने आणली भरघोस नफा मिळवून देणारी योजना, मिळेल ८० टक्क्यांपर्यंत सब्सिडी