India China FaceOff: चीनला धडा शिकवणार, लष्करप्रमुख मनोज नरवणे
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2020 06:38 AM2020-09-04T06:38:28+5:302020-09-04T06:38:47+5:30
सारे जग कोरोनाविरोधात लढत असताना विस्तारवादी चीनने भारताची भूमी बळकाविण्याचा प्रयत्न चालविला असून, त्याला भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर देण्यात येत आहे.
नवी दिल्ली : लडाखमधील चुशूल येथे चीनने घुसखोरीचा केलेला प्रयत्न भारतीय लष्कराने हाणून पाडल्यानंतर दोन्ही देशांतील तणाव आणखी वाढला आहे. त्यामुळे संरक्षणविषयक स्थितीचा आढावा घेण्यासाठी लष्करप्रमुख मनोज नरवणे हे गुरुवारपासून लडाखच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आले आहेत. चीनच्या आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी भारतीय लष्कराने सज्ज राहावे, असे आदेश नरवणे यांनी दिल्याचे कळते.
सारे जग कोरोनाविरोधात लढत असताना विस्तारवादी चीनने भारताची भूमी बळकाविण्याचा प्रयत्न चालविला असून, त्याला भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर देण्यात येत आहे. पँगाँग सरोवरानजीकच्या भागातही चीनने घुसखोरीचा प्रयत्न चालविला असून, तेथील महत्त्वाच्या भागांवर आता भारतीय सैनिकांनी आता मोर्चेबांधणी केली आहे. या सर्व स्थितीचा आढावा लष्करप्रमुख मनोज नरवणे यांनी लडाखमधील सैन्याधिकाऱ्यांकडून
घेतला.
1962
च्या युद्धात चीनने हिसकावून घेतलेली काही पर्वतशिखरेही भारतीय लष्कराने नुकतीच एक गोळी न झाडताही आपल्या ताब्यात घेतली असल्याचे सूत्रांनी सांगितले. ही मोहीम २९ व ३० आॅगस्टच्या रात्री पार पाडण्यात आली.
लडाखच्या सीमेवर भारताने अतिरिक्त सैन्य पाठविले असून, अक्साई चीनच्या भागात चीनच्या हवाई दलाच्या विमानांच्या हालचाली वाढल्या आहेत. त्याला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारताने या भागात विमानवेधी तोफा, तसेच अन्य प्रकारची शस्त्रास्त्रेही तैनात केली आहेत, तसेच त्यांची संख्या वाढविली आहे.
1598 कि.मी. लांब लडाखमध्ये चीनला लागून असलेल्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर गेल्या काही महिन्यांपासून तणाव सुरू आहे. पूर्व लडाखमधील गलवान येथे चिनी लष्कराने घुसखोरीचा प्रयत्न केला असता, त्यांना अडविताना झालेल्या संघर्षात भारताचे २० जवान शहीद झाले होते.
सीमेवरील परिस्थितीची
खरी माहिती द्यावी
80 कि़मी. दूरवर चीनचे लष्कर असून, लडाखच्या लेहमधील नेमकी परिस्थिती काय आहे, हे मोदी सरकारने साºया देशाला सांगावे, अशी मागणी लडाखचे माजी आमदार डेल्डन नामग्याल यांनी केली आहे.
लडाखच्या सीमेवर चीन व भारताचे सैन्य अत्यंत आक्रमक पवित्र्यात समोरासमोर उभे ठाकले आहे. भारतीय हद्दीत चीनने घुसखोरी केली आहे, हे आता मो दी सरकारने मान्य करायला हवे, असेही ते म्हणाले.
२० जवान शहीद झाल्यानंतर भारतात चीनविरोधात संतापाची लाट उसळली आहे.