भारत-चीनमधील सीमावाद संपणार! दोन्ही देशांमध्ये LAC वर गस्तीबाबत झाला महत्त्वाचा करार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2024 03:57 PM2024-10-21T15:57:35+5:302024-10-21T15:57:52+5:30

LAC संदर्भात भारत आणि चीनमध्ये सुरू असलेल्या वादात मोठे पाऊल उचलण्यात आले आहे.

India China Relations: India-China border dispute will end! The two countries reached an important agreement on patrolling the LAC | भारत-चीनमधील सीमावाद संपणार! दोन्ही देशांमध्ये LAC वर गस्तीबाबत झाला महत्त्वाचा करार

भारत-चीनमधील सीमावाद संपणार! दोन्ही देशांमध्ये LAC वर गस्तीबाबत झाला महत्त्वाचा करार

India China Relations : गेल्या काही वर्षांपासून भारत आणि चीनमध्ये वाद सुरू आहे. पण, आता हा वाद कमी होण्याची चिन्हे दिसत आहेत. याचे कारण म्हणजे, भारत आणि चीनने आपले सैन्य मागे घेण्यासाठी आणि प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (LAC) पुन्हा गस्त सुरू करण्यासाठी नवीन करार केला आहे. हा करार डेपसांग आणि डेमचोक भागात गस्त घालण्याशी संबंधित आहे. परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी सोमवारी याबाबत माहिती दिली. 22-23 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या 16 व्या ब्रिक्स परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रशिया दौऱ्यापूर्वी ही महत्त्वाची घडामोड आहे.

ब्रिक्स परिषदेच्या निमित्ताने चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग आणि पंतप्रधान मोदी यांच्यात द्विपक्षीय चर्चेच्या शक्यतेवर परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी म्हणाले, 'गेल्या अनेक आठवड्यांपासून भारत आणि चीनमध्ये राजनैतिक आणि लष्करी चर्चा सुरू आहे. एलएसी मुद्द्यांवर आमचा चीनशी करार आहे. सैन्य मागे घेण्यासाठी आणि परिस्थितीचे निराकरण करण्यासाठी गस्तीची व्यवस्था करण्यात आली आहे. द्विपक्षीय चर्चेच्या मुद्द्यावर आम्ही अजूनही वेळ आणि वचनबद्धतेनुसार काम करत आहोत.'

दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांमध्ये नुकत्याच झालेल्या चर्चेनंतर भारत आणि चीनमध्ये पूर्व लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (LAC) गस्त घालण्यासाठी करार झाला आहे. मिसरी म्हणाले की, 'गस्तीबाबतच्या करारानंतर दोन्ही देशांमधील एलएसीवरील तणाव कमी होण्याची अपेक्षा आहे. वास्तविक नियंत्रण रेषेवरील उर्वरित समस्या सोडवण्यासाठी भारतीय आणि चिनी वाटाघाटी गेल्या काही आठवड्यांपासून सुरू पर्कात आहे.

2020 पासून वाद वाढला
पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात 15-16 जून 2020 रोजी भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये चकमक झाली होती. यामध्ये 20 भारतीय जवान शहीद झाले, तर चीनी सैनिकांची संख्या जवळपास दुप्पट आहे. चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने कधीही आपल्या सैनिकांची अधिकृत आकडेवारी जाहीर केली नाही. या घटनेनंतर दोन्ही देशांमधील संबंध बिघडले. पण, आता हा वाद संपुष्टात येण्याची चिन्हे आहेत. 

Web Title: India China Relations: India-China border dispute will end! The two countries reached an important agreement on patrolling the LAC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.