'सीमेवरील शांतता आणि स्थैर्य, हीच भारत-चीन संबंधातील पहिली अट', जयशंकर थेट बोलले
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2024 04:47 PM2024-12-03T16:47:57+5:302024-12-03T16:49:31+5:30
India China Relations: भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी आझ लोकसभेत भारत-चीन संबंधांवर महत्वाची प्रतिक्रिया दिली.
India China Relations: काही दिवसांपूर्वीच भारत आणि चीन यांच्यात सीमेवर शांतता प्रस्थापित करण्यासाठी एक करार झाला. यानंतर दोन्ही देशांनी आपापले सैन्य मागे घेण्यास सुरुवात केली. आता या मुद्द्यावर भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी मंगळवारी (03 डिसेंबर 2024) लोकसभेत महत्वाची माहिती दिली. सीमेवर शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. एप्रिल 2020 पासून परिस्थिती असामान्य राहिली आहे. पण, आता राजनैतिक पुढाकारांमुळे परिस्थिती सुधारली असून, ही अशीच कायम ठेवण्यासाठी दोन्ही देशांनी पुढाकार घेतल्याची माहिती जयशंकर यांनी दिली.
परराष्ट्र मंत्री पुढे म्हणाले की, सध्या एलएसीवरील परिस्थिती पूर्वीपेक्षा चांगली झाली आहे. भारत आणि चीन यांच्यातील चर्चेच्या अनेक फेऱ्यांनंतर दोन्ही बाजूंनी या स्थितीत कोणताही एकतर्फी बदल केला जाणार नाही, यावर सहमती दर्शवली आहे. LAC वर शांतता प्रस्थापित करण्याचे सर्व श्रेय भारतीय लष्कराला जाते. सीमेवर स्थैर्य राखण्यात आपल्या सैनिकांच्या निर्धाराने महत्त्वाची भूमिका बजावली असल्याचेही जयशंकर यांनी म्हटले.
सीमेवर शांततेचे महत्त्व
सीमेवरील शांतता आणि स्थैर्य ही भारत-चीन संबंधांची पूर्वअट आहे, यावर परराष्ट्र मंत्र्यांनी भर दिला. सीमा व्यवस्थापनाबाबत भारत आणि चीनमध्ये झालेल्या जुन्या करारांची अंमलबजावणी केली जात आहे. सीमेवरील परिस्थितीमध्ये कोणताही गडबड होणार नाही, यावर दोन्ही देशांनी एकमत केले आहे. दोन्ही देश संवाद आणि सहमतीच्या आधारेच सर्व प्रश्न सोडवतील.
भारत-चीन संबंधांवर काय परिणाम होईल?
सीमेवर परिस्थिती सामान्य झाल्यानंतरच भारत आणि चीन यांच्यात द्विपक्षीय चर्चा शक्य होईल, असेही परराष्ट्रमंत्र्यांनी स्पष्ट केले. सीमावादामुळे भारत आणि चीनमधील व्यापार आणि सामरिक भागीदारीवर परिणाम झाला आहे. दोन्ही देश आशियातील प्रमुख आर्थिक शक्ती आहेत, परंतु त्यांच्यातील तणावाचा परिणाम जागतिक पुरवठा साखळीवरही होतो. केवळ भारत आणि चीनच्याच नव्हे तर संपूर्ण प्रदेशाच्या स्थैर्यासाठी सीमा विवादाचे निराकरण महत्त्वाचे आहे. हा वाद मिटला तर आशिया खंडातील चिरस्थायी शांततेच्या दिशेने एक