‘भारत, चीनने जबाबदार बनावे’
By admin | Published: May 7, 2014 11:10 PM2014-05-07T23:10:15+5:302014-05-07T23:10:15+5:30
भारत आणि चीनसारख्या मोठ्या प्रमाणात कार्बन उत्सर्जन करणार्या देशांनी हवामान बदलाचा जागतिक प्रश्न सोडविण्याच्या मोठ्या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी जबाबदार बनले पाहिजे, असे अमेरिकेने म्हटले आहे.
वॉशिंग्टन : भारत आणि चीनसारख्या मोठ्या प्रमाणात कार्बन उत्सर्जन करणार्या देशांनी हवामान बदलाचा जागतिक प्रश्न सोडविण्याच्या मोठ्या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी जबाबदार बनले पाहिजे, असे अमेरिकेने म्हटले आहे. भारत आणि चीनबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर व्हाईट हाऊसचे माध्यम सचिव जे कार्नी यांनी पत्रकारांना ही माहिती दिली. ते म्हणाले, अधिक कार्बन उत्सर्जन करणार्या देशांनी या समस्येला सामोरे जाण्यासाठी जबाबदार बनणे हे निश्चितपणे खूप गरजेचे आहे. अमेरिकेचा राष्ट्रीय हवामान अहवाल आल्यानंतर अमेरिकेने ही प्रतिक्रिया दिली. या अहवालात वाढते तापमान, आणि अनियमित हवामानाच्या परिणामांपासून बचावासाठी अमेरिकेला तयार करण्याच्या दृष्टीने तात्काळ पावले उचलण्याची मागणी करण्यात आली आहे. (वृत्तसंस्था) कार्नी म्हणाले, ऊर्जा आयात बंद करणे, ऊर्जास्रोतांमध्ये विविधता आणणे हे निश्चितपणे अमेरिकी राष्ट्रीय सुरक्षेच्या हिताचे आहे. त्यामुळेच या समस्येचा समग्र मुकाबला हवामान बदलाच्या परिणामांपासून बचावासाठी आमची तयारी आणि क्षमता चांगली करण्यासाठी गरजेचा आहे. हवामान बदलाचे वातावरणावर होणारे परिणाम गंभीर आहेत आणि त्याचा आमचा देश, आमची जनता व अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होत आहे. अनेक दिवस राहणारे अधिक तापमान आणि गंभीर दुष्काळी परिस्थिती तुम्ही पाहतच आहात. मोठ्यात मोठी वादळे येत आहेत. ज्यात आम्ही सँडी वादळ पाहिले. वैज्ञानिक अनुमानानुसार ही वादळे आणखी तीव्र बनणार आहेत. (वृत्तसंस्था)