डोकलाम वादानंतर भारतानं तयार केला 'मास्टर प्लॅन'; म्हणून चीन भडकला
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2020 10:57 PM2020-06-01T22:57:11+5:302020-06-01T23:10:20+5:30
डोकलाममध्ये जवळपास ७३ दिवस चीन अन् भारताचे जवान एकमेकांसमोर उभे ठाकले होते. त्यानंतर दोन्ही देशांनी आपलं सैन्य माघारी बोलावलं.
सैन्य शिबिरे, मॉडेल व्हिलेज, बोगदे, चौपदरी रस्ता अशा अनेक स्तरावर भारत डोकलाम वादानंतर LACकडचा आपल्या हद्दीतील भाग विकसित केला आहे. लडाखमध्ये चीन दाखवत असलेला आक्रमक पवित्रा हासुद्धा त्यांच्या रणनीतीचा एक भाग आहे. डोकलाममध्ये जवळपास ७३ दिवस चीन अन् भारताचे जवान एकमेकांसमोर उभे ठाकले होते. त्यानंतर दोन्ही देशांनी आपलं सैन्य माघारी बोलावलं. तेव्हापासूनच सीमावादावरून चीन आणि भारतामध्ये एक प्रकारची ठिणगी पडली आहे. डोकलाम हे भारत-चीन- भूतानचं ट्रायजंक्शन आहे. तिन्ही देशांच्या सीमा इथे येऊन मिळतात. भूताच्या भागात चीननं रस्ते निर्माणाचं कार्य सुरू केलं होतं. त्याला भारतानं विरोध केल्यानंतर ते थांबवण्यात आलं.
गेल्या महिन्याच्या ५ व ६ तारखेला लडाखच्या वादग्रस्त पँगाँग तलावाजवळ भारतीय जवान आणि चिनी सैन्य समोरासमोर आले, ज्यामुळे संपूर्ण प्रदेशात तणावाची परिस्थिती निर्माण झाली. मागील वर्षी भारतीय लष्कराने पूर्व लडाख आणि अरुणाचल प्रदेशमध्ये दोन महिन्यांत दोन महत्त्वाचे सैन्य सराव केले होते. चीनच्या तुलनेत आपण मागे तर नाही ना, यासाठी स्वतःच्या युद्ध क्षमतेचं मूल्यांकन करण्यासाठीच हे सगळं भारताकडून करण्यात आलं होतं. हा सर्व प्रकार चीनचं आक्रमणाच्या स्वरूपात पाहिला. त्यामुळेच चीननं लडाखमध्ये अधिक आक्रमक पवित्रा भारताला दाखवला
चिनी गावे आणि सैन्याच्या छावणींचा विस्तार?
चिनी सैन्य एकात्मिक मॉडेलअंतर्गत गावे तयार करत आहे, जेणेकरून एलएसीजवळ छावणीचा विस्तार करता येईल. सेना आणि नागरी लोकसंख्या सीमारेषेवर एकत्र राहिल्यास त्याचा चीनला फायदा होणार आहे. गेल्या काही वर्षात येथे बास्केटबॉल, व्हॉलीबॉल कोर्ट यासारख्या क्रीडा व मनोरंजक सुविधा उपलब्ध असणार्या मोठ्या इमारती आणि निवासी संकुले चीननं बांधली आहेत. या संकुलामागील चीनचा हेतू हा दुहेरी आहे. जेणेकरून वाढत्या तणावाच्या परिस्थितीत अधिकाधिक जमिनीवर दावा मजबूत केला जाऊ शकेल. एलएसीमध्ये अशी दोन डझनहून अधिक एकात्मिक गावे आहेत. यातील बहुतांश भाग अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीमधल्या पूर्व क्षेत्रात आहे. चिनी लष्कराच्या देखरेखीखाली असलेल्या या गावांजवळ हॉटेल उभारण्याचीही योजना आहे. चौपदरी रस्त्याने जोडलेल्या आदिवासी व आदिवासींची येथे वस्ती करणे हा या गावांचा उद्देश आहे.
डोकलामनंतर चीनने लष्करी सामर्थ वाढवलं
डोकलाममधील वाद संपला असला तरी चीनच्या बाजूने लष्करी पायाभूत सुविधांचा विस्तार थांबलेला नाही. डोकलामनंतर चीनने एलएसीमध्ये विविध क्षेत्रांत आपली रेजिमेंट तैनात केली. एलएसीपासून त्यांचे अंतर फक्त 20 किलोमीटर आहे. चिनी सैन्याची जमवाजमव करण्याची वेळ कमी व्हावी, या उद्देशाने या नव्या इमारती बांधण्यात आल्या आहेत.
नवीन प्रशिक्षण मॉड्यूलमध्ये फायरिंग, हँड ग्रेनेड्सचा समावेश
2017मध्ये डोकलाम वादानंतर लवकरच चिनी पीपल्स लिबरेशन आर्मीने एलएसीवरचा आपला प्रशिक्षण कार्यक्रम वाढवला. नवीन प्रशिक्षण मोड्यूल्समध्ये सतत गोळीबार करणे, ग्रेनेड फेकणे आणि कठोर शारीरिक कवायती समाविष्ट केल्या आहेत.
भारताची नवी रणनीती, चीनही झाला सतर्क
चीनच्या नव्या युद्ध रणनीतीला प्रत्युत्तर देतानाच भारतानंही आपली लष्करी रचना आणि सामर्थ्यही वाढवलं आहे. सध्या एलएसीवर भारतानं रस्ते बांधकाम आणि पायाभूत सुविधांच्या विकासावर भर दिला आहे, त्यालाच चीनने आक्षेप घेतला. गेल्या वर्षी सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये भारतीय लष्कराने लडाख आणि अरुणाचल प्रदेश या दोन भागात युद्ध सराव केला होता. भारतीय लष्कराने सप्टेंबरमध्ये पूर्व लडाखमध्ये आपल्या विविध सैन्य तुकड्यांसह लष्करी अभ्यास केला. सराव क्षेत्रात भारतीय आणि चिनी सैनिकांची चकमक झाल्यानंतर काही दिवसांनी हा प्रकार घडला. या व्यायामात टॅंक, इन्फन्ट्री कर्मचारी, हेलिकॉप्टर जंपिंग पॅराट्रुपर्स, मेकेनाइज्ड इन्फंट्रीचाही समावेश होता.
हेही वाचा
लग्नासाठी मागितलं स्वातंत्र्य; सरकारनं दिला 'क्रूर' झटका! भयानक आहे सौदीतील महिलांचं आयुष्य
राज्यात सर्व माध्यमांच्या शाळेत मराठी भाषा सक्तीची, ठाकरे सरकारचा निर्णय
ATKT असलेल्या 40 टक्के विद्यार्थ्यांना नापास करणार का?, शेलारांचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
CoronaVirus News: छोट्या व्यावसायिकांना मोठा आधार; MSMEsसाठी सरकारकडून 20000 कोटींच्या पॅकेजची घोषणा
CoronaVirus : भारत लढा जिंकणारच! DRDOकडून कोरोनावर औषध तयार; लवकरच घेणार चाचणी
परदेशी वस्तूंना आता बाय बाय; भारतात पॅरामिलिट्री कँटीनमध्ये मिळणार फक्त स्वदेशी उत्पादनं