India China Standoff : आता चीनला रोखणार हा 'अजेय योद्धा', लवकरच हवाई दलाच्या ताफ्यात होणार दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2020 06:03 PM2020-06-29T18:03:56+5:302020-06-29T18:11:13+5:30
पूर्व लडाखमध्ये भारत आणि चीनदरम्यान झालेल्या हिंसक झटापटीनंतर गेल्या दोन आठवड्यांपासून भारतीय हवाई दल अलर्टवर आहे.
नवी दिल्ली -भारत-चीन तणाव दिवसागणीक वाढतच चालला आहे. असे असतानाही दोन्ही देश शांततेसाठीही प्रयत्न करत आहेत. मात्र, सध्या चर्चेचा काहीही परिणाम स्पष्टपणे येताना दिसत नाही. आता भारताला कुठल्याही आघाडीवर मागे रेटने अशक्य आहे, हे चीनने जाणले आहे. आता भारताच्या शस्त्रागारात सर्वात मोठे शस्त्र आणि अजेय वायू योद्धा अशी ओळख असेले राफेल फाइटर जेट सामील होत आहे. 27 जुलैपर्यंत सहा फायटर जेटची पहिली खेप भारताला मिळू शकते.
36 राफेल जेटचा सौदा -
फ्रान्ससोबत झालेल्या राफेल खरेदी करारांतर्गत भारताला एकूण 36 राफेल जेट मिळणार आहेत. याची पहिली खेप 27 जुलैला भारताला मिळणार आहे. योजनेनुसार पूर्वी 4 राफेल लढाऊ विमानं अंबाला येथे पोहोचणार होती मात्र, आता याहून अधिक विमानं फ्रान्स पाठवणार आहे. यानुसार, 8 विमानांचे सर्टिफिकेशन मिळणार आहे.
हवाई दल अलर्टवर -
पूर्व लडाखमध्ये भारत आणि चीनदरम्यान झालेल्या हिंसक झटापटीनंतर गेल्या दोन आठवड्यांपासून भारतीय हवाई दल अलर्टवर आहे. 2 जूनला संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी फ्रान्सच्या संरक्षणमंत्री फ्लोरेन्स पॅली यांच्याशी फोनवरून संपर्क साधला. यावेळी, कोरोना व्हायरस महामारी असली तरी, राफेल जेट ठरलेल्या वेळेच्या आत भातात पोहोचतील, असे पॅली यांनी म्हटले होते.
हवाई दलाची क्षमता वाढेल -
लष्करातील एका अधिकाऱ्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले, की राफेल जेट्सच्या येण्याने भारतीय हवाई दलाची तागद प्रचंड वाढेल. हवाई दलाचा पहिला ताफा अंबाला हवाई दलाच्या स्टेशनवर तैनात केला जाईल. हवाई दलाच्या रणनीतीच्या दृष्टीने हेदेखील एक महत्वाचे ठिकाण आहे.
36 राफेल जेट विमानांपैकी 30 फायटर जेट असतील तर सहा ट्रेनर असतील. ट्रेनर जेट ट्विन-सीटर असतील आणि त्यांच्यात फायटर जेट्ससारखीच सर्व व्यवस्था असेल. विमानाचे दर आणि कथित भ्रष्टाचारासह या सौद्यावर काँग्रेसने प्रश्न उपस्थित केले होते. मात्र, सरकारने काँग्रेसचे सर्व आरोप फेटाळून लावले होते.
India China Tension : चीनचा सामना करण्यासाठी 'भीष्म' मैदानात, 'ही' आहे 'खासियत'