Breaking! भारत-चीन सीमेवर पुन्हा एकदा झटापट; चिनी सैन्याच्या घुसखोरीचा प्रयत्न भारतीय जवानांनी उधळला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2020 11:12 AM2020-08-31T11:12:55+5:302020-08-31T11:33:36+5:30
चिनी सैन्याला भारतीय जवानांकडून चोख प्रत्युत्तर
लडाख: भारत आणि चीनच्या सैन्यामध्ये पुन्हा एकदा झटापट झाल्याची माहिती समोर येत आहे. पूर्व लडाखमधील पँगाँग तलाव परिसरात चिनी सैनिकांनी २९-३० ऑगस्टच्या मध्यरात्री घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. भारतीय जवानांनी चिनी सैन्याला चोख प्रत्युत्तर दिलं. भारत आणि चीन सैन्यामध्ये झालेल्या बैठकांमध्ये काही गोष्टींबद्दल सहमती झाली होती. त्यांचं उल्लंघन करण्याचा प्रयत्न चीनकडून करण्यात आल्याची माहिती भारतीय सैन्यानं दिली आहे.
On the night of 29/30 August, PLA troops violated the previous consensus arrived at during military & diplomatic engagements during an ongoing standoff in Eastern Ladakh and carried out provocative military movements to change the status quo: Col Aman Anand, PRO, Army pic.twitter.com/mSjoZJ4Ijg
— ANI (@ANI) August 31, 2020
पँगाँग तलावाच्या दक्षिणी किनाऱ्यावरून चिनी सैन्यानं घुसखोरीचा प्रयत्न केला. त्याला भारतानं विरोध केला. चिनी सैन्याला भारतीय सैन्यानं रोखलं. त्यानंतर भारतानं या भागातील फौजफाटा वाढवला. पँगाँग तलाव परिसरात दोन्ही सैन्यांमध्ये झटापट झाल्यानंतर चुशूलमध्ये ब्रिगेड कमांडर दर्जाच्या अधिकाऱ्यांची बैठक सुरू आहे.
Indian troops pre-empted this PLA activity on the Southern Bank of Pangong Tso Lake, undertook measures to strengthen our positions and thwart Chinese intentions to unilaterally change facts on ground: Col Aman Anand, PRO, Army https://t.co/oTQNAw5ebr
— ANI (@ANI) August 31, 2020
गेल्या चार महिन्यांपासून पूर्व लडाखमधील सीमावर्ती भागातील तणाव कमी झालेला नाही. तणाव कमी करण्यासाठी दोन्ही सैन्याच्या अधिकाऱ्यांच्या बैठकांचं सत्र सुरू आहे. मात्र अद्यापही परिस्थितीत बदल झालेला नाही. एप्रिल पूर्वी असलेली परिस्थिती कायम ठेवावी, अशी स्पष्ट भूमिका भारतानं घेतलेली आहे. एका बाजूला लष्करी अधिकाऱ्यांच्या बैठका सुरू असताना दुसऱ्या बाजूला परराष्ट्र मंत्रालयांच्या माध्यमातूनही चर्चा सुरू आहेत. पूर्व लडाखमधून सैन्य माघारी घेण्याबद्दल दोन्ही देशाचं एकमत झालं आहे. मात्र त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही.
The Indian Army is committed to maintaining peace and tranquility through dialogue, but is also equally determined to protect its territorial integrity. A Brigade Commander level Flag Meeting is in progress at Chushul to resolve the issues: Col Aman Anand, PRO, Army
— ANI (@ANI) August 31, 2020
याआधी १५ जूनला भारत आणि चीनच्या सैन्यात गलवान खोऱ्यात जोरदार झटापट झाली होती. यामध्ये भारताचे २० जवान शहीद झाले. तर चीनचे ३५ ते ४० जवान मारले गेले. या झटापटापूर्वीही भारत आणि चिनी सैन्यात अनेकदा चर्चा झाल्या. मात्र तरीही सीमेवरील तणाव कमी झालेला नाही. चिनी सैन्य पूर्व लडाखमधून मागे हटायला तयार नाही. उलट या भागात फायबर ऑप्टिक केबलचं जाळं टाकण्यास चीननं सुरुवात केली आहे. चीन आक्रमक पवित्र्यात असल्याचं सॅटेलाईट फोटोंमधूनही दिसत आहे. त्यामुळे भारतानंदेखील सीमेवरील जवानांची संख्या वाढली आहे.
समुद्रातही चीनला भिडण्याची तयारी सुरू
भारतीय नौदलानं गलवान व्हॅलीतील घटनेनंतर चीनसोबतचा तणाव पाहून चीनच्या समुद्रात युद्धनौकाच तैनात केली आहे. महत्वाचं म्हणजे याच दक्षिण चीन समुद्रात अमेरिकेच्याही मोठमोठ्या विमानवाहू युद्धनौका तैनात आहेत. त्यांच्या जोडीनेच भारतानेही आघाडीची युद्धनौका पाठवली आहे.
गलवान खोरं का महत्त्वाचं?
गलवान खोऱ्याचे स्वत:चे असे सामरिक महत्त्व आहे. त्यामुळे या भागावर नियंत्रण मिळवण्यासाठी चीनचा आटापिटा सुरू आहे. गलवान नदीच्या आसपास वसलेल्या या प्रदेशामध्ये १९६२ नंतर प्रथमच तणाव निर्माण झाला आहे. खरंतर या भागातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेची आखणी स्पष्टपणे झालेली आहे. तसेच ती दोन्ही पक्षांनी स्वीकारही केली होती. मात्र आज दोन्ही देशांचे सैन्या नियंत्रण रेषेजवळ समोरासमोर आलेले आहे.
१९६२ मध्ये चीनने भारतावर पूर्व आणि उत्तर भागातून आक्रमण केले होते. त्यात लडाखमधील भागावर हल्ला करण्याचे कारण म्हणजे चीनने शिन्जियांग प्रांत आणि तिबेटदरम्यान, एक रस्ता बांधला. जी२१९ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या रस्त्याचा सुमारे १७९ किमी भाग चीनने भारतापासून बळकावलेल्या अक्साई चीनमधून जातो. दरम्यान, हा रस्ता बांधल्यानंतर चीनने या भागावर दावा केला. तसेच १९६२ च्या युद्धात आक्रमण करून केलेल्या दाव्यापेक्षा अधिक भागावर कब्जा केला.
चीन या शिन्जियांग-तिबेट महामार्गापासून भारताला दूर ठेवण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यामुळे या देशाने या क्षेत्रातील सर्व प्रमुख दऱ्या आणि क्रेस्टलाइन्सवर आपला कब्जा दिसेल असा दावा केला. आहे. युद्धकाळात उंचावर असेल्यांना युद्धक्षेत्रात आघाडी असते. त्यामुळे भारताला उंचावरील क्षेत्रात हुकूमत प्रस्तापित करता येऊ नये असा चीनचा प्रयत्न आहे.
दरम्यान, गलवान खोऱ्यातील गलवान नदीच्या बाबतीत रिजलाईन नदीजवळून जाते. त्यामुळे श्योर रूटवरील दऱ्यांमध्ये चीनला आघाडी घेण्याची संधी मिळते. जर चीनने गलवान खोऱ्यातील संपूर्ण भागाला नियंत्रित केले नसते तर अक्साई चीनच्या पठारावर भारताला पोहोचता आले अशते. त्यामुळे चीनला धोका निर्माण झाला असता.
दरम्यान, लडाखमधील उत्तर पूर्व भागात असलेला दौलत बेग ओल्डी हा भाग भारताच्या नियंत्रणात आहे. अक्साई चीन पठारावरील भारताच्या उपस्थितीचे प्रतिनिधित्व हा भाग करतो. या भागाला जोडणारा चांगला रस्ता नसल्याने येथे विमान किंवा हेलिकॉप्टरच्या मदतीने नियंत्रणात ठेवले जात आहे. मात्र या भागात रस्त्याची बांधणी करण्याचे काम सुरू आहे. मात्र हा रस्ता श्योक नदीच्या पश्चिम किनाऱ्यावर असल्याने हिमनग वितळल्यानंतर या रस्त्याचे नुकसान होते. श्योक नदीच्या किनाऱ्यावरून दौलत बेग ओल्डीकडे जाणारा मार्ग हा मार्ग भारताच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे.
समुद्रात चीनची दादागिरी रोखणार?, नव्या 6 पाणबुड्या खरेदीची भारताची तयारी
गलवान व्हॅलीचा बदला! भारताने दक्षिण चीन समुद्रात युद्धनौका धाडल्या; पाणबुड्याही तयारीत
चीन डोकलाम अन् नाथू लामध्ये तयार करतोय मिसाइल साइट्स, सॅटेलाइट फोटोंतून उघड