India China Faceoff : लष्कराला 'इमर्जन्सी पॉवर्स'; चीनला जशास तसं प्रत्युत्तर देण्यासाठी सरकारकडून 'फ्री-हँड'

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2020 05:52 PM2020-06-17T17:52:08+5:302020-06-17T18:05:36+5:30

India Chine Faceoff : चीनच्या आक्रमक कारवाईला जशास तसे उत्तर देण्यासाठी मोदी सरकारनंही लष्कराला सर्वाधिकार बहाल केले आहेत. 

India Chine Faceoff : Indian Army given emergency powers to combat Chinese at LAC | India China Faceoff : लष्कराला 'इमर्जन्सी पॉवर्स'; चीनला जशास तसं प्रत्युत्तर देण्यासाठी सरकारकडून 'फ्री-हँड'

India China Faceoff : लष्कराला 'इमर्जन्सी पॉवर्स'; चीनला जशास तसं प्रत्युत्तर देण्यासाठी सरकारकडून 'फ्री-हँड'

Next

नवी दिल्लीः लडाखच्या गलवान खोऱ्यात LACवर भारत-चीन सैन्यांमध्ये झालेल्या हिंसक चकमकीत भारताचे २० जवान शहीद झाले. तर चीनच्या ४३ सैनिकांना ठार करण्यात आलेलं आहे. त्यानंतर चीनच्या आक्रमक कारवाईला जशास तसे उत्तर देण्यासाठी मोदी सरकारनंही लष्कराला सर्वाधिकार बहाल केले आहेत. वास्तविक नियंत्रण रेषेत (एलएसी) कोणत्याही चिनी आक्रमणाविरोधात लढण्यासाठी भारतीय सैन्याला पूर्ण स्वातंत्र्याचे आपत्कालीन अधिकार देण्यात आले आहेत. सोमवारी रात्री झालेल्या हिंसक संघर्षानंतर सरकारने हा निर्णय घेतला आहे.

ज्या ठिकाणी संघर्ष झाला, त्या गलवान खोऱ्यात भारतीय लष्कराला चीनविरोधातील कारवाईसाठी मोकळीक देण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे याच भागात चीनच्या पीएलएनं युद्धसराव केला आहे. भारतीय लष्कर आणि चिनी सैन्य गेल्या महिन्याभरापासून लडाखच्या सीमेवर एकमेकांसमोर उभे ठाकलेले आहेत. चीन वारंवार भारताच्या भूमीत घुसखोरी करत असून, भारतीय जवानही त्याला वेळोवेळी रोखत असल्यानं चकमक उडत आहे. तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही चीनला जशास तसे उत्तर देण्यात आम्ही सक्षम असल्याचं व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सांगितलं होतं. 

आम्ही कधीच कोणाला उकसवलं नाही. तसेच आम्ही देशाची अखंडता आणि सार्वभौमत्वाशी कोणतीही तडजोड करणार नाही. जेव्हा कधी वेळ आली तेव्हा आम्ही देशाची अखंडता आणि सार्वभौमत्वाचं संरक्षण करण्यासाठी शक्तीचं प्रदर्शन केलं आहे. आपले जवान मारता मारता शहीद झाले आहेत याचा देशाला अभिमान आहे. आमच्या क्षमता वेळोवेळी आम्ही सिद्ध केलेल्या आहेत. आमच्या जवानांचं बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही. भारताची अखंडता आणि सार्वभौमत्वाशी कोणालाही छेडछाड करू देणार नाही, यासंदर्भात कोणालाही संभ्रम असण्याचं कारण नाही. भारताला शांती हवी आहे. पण जर भारताला संघर्षासाठी उकसवल्यास चोख प्रत्युत्तर देण्यात सक्षम आहे, असंही मोदींनी चीनला ठणकावलं आहे. 

हेही वाचा

India China Faceoff: भारत-चीन सैन्यातील हिंसक झटापटीनंतर पंतप्रधान मोदींनी बोलावली सर्वपक्षीय बैठक

India China Faceoff: मोदीजी बाहेर या, कुठे लपून बसला आहात?, राहुल गांधींचा हल्लाबोल

CoronaVirus News : आरोग्य कर्मचाऱ्यांना वेळेत वेतन द्या, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

CoronaVirus News: "अखेर सत्य पुढे आलेच"; कोरोनाबळींचा आकडा वाढला, फडणवीसांनी सरकारवर निशाणा साधला!

Web Title: India Chine Faceoff : Indian Army given emergency powers to combat Chinese at LAC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.