चीनवर नजर ठेवण्यासाठी भारत अमेरिका येणार साथ-साथ ?
By admin | Published: February 9, 2017 06:32 PM2017-02-09T18:32:19+5:302017-02-09T18:32:19+5:30
समुद्रांमध्ये मुक्त वावर करत असलेल्या चिनी पाणबुड्यांवर नजर ठेवण्यासाठी अमेरिका आणि भारत एकत्र येऊन काम करण्याची शक्यता आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 9 - चीनची वाढती ताकद आणि समुद्रातील वाढते शक्तिप्रदर्शन यामुळे भारतासह जगातील अनेक देशांची चिंता वाढली आहे. आता समुद्रांमध्ये मुक्त वावर करत असलेल्या चिनी पाणबुड्यांवर नजर ठेवण्यासाठी अमेरिका आणि भारत एकत्र येऊन काम करण्याची शक्यता आहे. अमेरिकेकडून सादर करण्यात आलेल्या प्रस्तावावरून तरी तशी चिन्हे दिसत आहेत. डोनाल्ड ट्रम्य यांचे प्रशासन या करारावर सही करण्यासाठी भारताला आग्रह करण्याची शक्यता आहे. पण भारत मात्र या कराराबाबत सावधपणे पावले उचलत आहे.
अमेरिकेच्या पॅरिफिक आघाडीचे कमांडर अॅडमिरल हॅरिस बी. हॅरिस यांनी गेल्या महिन्यात COMCASA करारामुळे दोन्ही देशांचे नौदल दुसऱ्या देशांच्या पाणबुड्यांवर प्रभावीपणे नजर ठेवू शकेल, असे म्हटले होते. त्यांच्या वक्तव्याचा कटाक्ष साहजिकच चीनकडे होता.
2004 साली अमेरिकेने भारतासोबत लष्करी सहकार्य वाढवण्यासाठी चार प्राथमिक करारांचा प्रस्ताव ठेवला होता. त्यातील एक लागू झाला आहे. तर दुसरा लागू होण्याच्या मार्गावर आहे. तर (COMCASA) आणि (BECA) या करारांबाबत मात्र अद्याप सहमती झालेली नाही. त्यातील COMCASA करारानुसार दोन्ही देशांच्या सैन्याला सुरक्षित संभाषणाची सुविधा प्राप्त होईल. म्हणजेच दोन्ही देशांची विमाने एकमेकांशी डेटा शेअर करू शकतील. त्याबरोबरच BECA करारामुळे कुठल्याही विशिष्ट्य ठिकाणाचा डेटाही शेअर करता येईल. मात्र असे असले तरी सध्या या करारांवर सह्या करण्याचा भारताचा विचार नाही.