चीनच्या खेळीला उत्तर देण्यासाठी भारत सज्ज; म्यानमारला लवकरच सोपविणार INS सिंधूवीर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2019 10:58 AM2019-12-09T10:58:55+5:302019-12-09T11:03:18+5:30

म्यानमारने भारतासोबत २०१६ मध्ये हा करार केला होता.

India Continuing Policy To Counter China Set To Hand Over Submarine To Myanmar | चीनच्या खेळीला उत्तर देण्यासाठी भारत सज्ज; म्यानमारला लवकरच सोपविणार INS सिंधूवीर

चीनच्या खेळीला उत्तर देण्यासाठी भारत सज्ज; म्यानमारला लवकरच सोपविणार INS सिंधूवीर

Next

नवी दिल्ली - भारतानेम्यानमारसोबत द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यामागे आशियात चीनचं आव्हानाला समोर जाण्याची रणनीती आखली आहे. भारताकडूनम्यानमारला औपचारिकरित्या सबमरीन सोपविण्यात येणार आहे. म्यानमारमध्ये चीनचा हस्तक्षेप रोखण्यासाठी भारताने योजना बनविली आहे. म्यानमारला आयएनएस सिंधूवीर सोपविण्यामागे भारताची हीच योजना असल्याचं दिसून येतं. 

3 हजार टनाची आयएनएस सिंधूवीर ३१ वर्ष आहे पण रशिया आणि भारताकडून यांच्याकडून तिची नियमित देखभाल केली जाते. अलीकडेच विशाखापट्टनममध्ये हिंदूस्तान शिपयार्ड लिमिटेड येथे डीझल इलेक्ट्रिक बोटीचं आधुनिककरणाचं काम केलं गेलं. भारतीय नौदलाकडून या मुद्दयावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नाही. परंतु सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार म्यानमारकडून आयएनएस सिंधूवीरचा वापर प्रशिक्षणासाठी केला जाणार आहे. पाण्याच्या खाली कॉम्बिंग ऑपरेशन प्रशिक्षण दिलं जाणार आहे. मार्च-एप्रिल २०२० पासून याची सुरुवात केली जाईल असं सांगण्यात आलं आहे. 

तसेच म्यानमारकडून अशाचप्रकारे सिंधूघोष सबमरीन खरेदी करण्याची योजना आहे. म्यानमारने भारतासोबत २०१६ मध्ये हा करार केला होता. बांग्लादेश आणि चीन यांच्यामध्ये मिंग क्लास डीझल इलेक्ट्रिक सबमरीन खरेदी करण्याच्या करारानंतर म्यानमारने भारतासोबत हा करार केला. चीनकडून बांग्लादेशाला दिवसेंदिवस सहकार्य वाढत चालले आहे. 

म्यानमारला सबमरीन सोपविण्यासोबतच भारत त्यांच्या नौसैनिकांना प्रशिक्षण देण्याची व्यवस्था करणार आहे. सध्या म्यानमारच्या सैनिकांना भारतीय नौदलाकडून विशाखापट्टनम येथे आयएनएस सतवाहन याठिकाणी प्रशिक्षण देण्याचं काम सुरु आहे. सूत्रांच्या माहितीनुसार मागील काही वर्षापासून रंगून येथे नौसैनिकांना मोबाईल ट्रेनिंगसाठी टीम पाठवित आहे. त्याठिकाणी नौदलाच्या जवानांना विशेष प्रशिक्षण दिलं जातं. 
 

Web Title: India Continuing Policy To Counter China Set To Hand Over Submarine To Myanmar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.