पाच देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढले, देशात सरकार सतर्क, राज्यांना दिल्या 'या' सूचना

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2022 08:46 PM2022-12-20T20:46:55+5:302022-12-20T20:47:20+5:30

गेल्या एक वर्षापासून जगभरात कोरोनाचे रुग्ण कमी झाले होते, पण आता पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढले आहे.

india corona genome testing china america case | पाच देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढले, देशात सरकार सतर्क, राज्यांना दिल्या 'या' सूचना

पाच देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढले, देशात सरकार सतर्क, राज्यांना दिल्या 'या' सूचना

googlenewsNext

गेल्या एक वर्षापासून जगभरात कोरोनाचे रुग्ण कमी झाले होते, पण आता पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढले आहे. चीन आणि अमेरिकेत कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सचिव राजेश भूषण यांच्या वतीने एनसीडीसी आणि आयसीएमआरला पत्र लिहिले आहे. सध्या देशात कोरोनाचे फारसे रुग्ण नाहीत, मृत्यू संख्याही जास्त नाही. मात्र हा विषाणू पुन्हा जगभर पसरत असल्याने अशा परिस्थितीत सरकार सतर्क झाले आहे.

आरोग्य सचिव राजेश भूषण यांच्या वतीने एनसीडीसी आणि आयसीएमआरला पत्र लिहिले आहे. जर कोरोनाचा नवा व्हेरियंट वेळेत ओळखायचे असेल तर त्यासाठी जीनोम सिक्वेन्सिंग आवश्यक आहे. जीनोम सिक्वेन्सिंगसाठी नमुने पाठवण्याच्या सूचनाही राज्यांना देण्यात आल्या आहेत. याशिवाय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया उद्या आढावा बैठक घेणार आहेत. एकीकडे भारत सरकार सर्व राज्यांना काळजी घेण्यास सांगत असले तरी दुसरीकडे घाबरू नका असा सल्लाही देत ​​आहे.

'चीनमधील परिस्थितीबद्दल भारताला काळजी करण्याची काहीच गरज नाही. चीनमध्ये पुन्हा कोरोना व्हायरस वेगाने पसरत आहे. भारतात लसीकरण मोठ्या प्रमाणावर झाले आहे. वयस्कर लोकसंख्येमध्ये, बहुतेक लोकांना लसीकरण केले गेले आहे, असं डॉ. एनके अरोरा म्हणाले. कोरोनाचे आतापर्यंत जेवढे व्हेरियंट जगात आले आहेत, त्यांचे व्हेरियंट देशात आढळून आली आहेत. अशा परिस्थितीत काळजी न करता फक्त काळजी घेण्याची गरज आहे, असंही अरोरा म्हणाले. 

भारत आणि चीनच्या परिस्थितीत फरक आहे. चीनमध्ये सध्या कोरोनाचा स्फोट झाला आहे कारण तेथे मोठ्या प्रमाणावर लसीकरण केले नाही. त्यांच्या वृद्ध लोकसंख्येमध्ये, बऱ्याच लोकांना कोरोनाची लस मिळालेली नाही. आतापर्यंत 60 वर्षांपेक्षा जास्त लोकसंख्येपैकी 87% लोकसंख्येचे पूर्णपणे लसीकरण केले आहे, पण 80 वर्षांवरील वृद्धांपैकी फक्त 66.4% लोकांचे लसीकरण करण्यात आले आहे.

सरकारी नोकरीच्या लालसेपोटी पतीची हत्या, मित्रासोबत रचला भयानक कट!

Web Title: india corona genome testing china america case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.