भारत पराभूत

By admin | Published: December 20, 2014 10:27 PM2014-12-20T22:27:02+5:302014-12-20T22:27:02+5:30

पुन्हा पराभवाची नामुष्की

India defeats | भारत पराभूत

भारत पराभूत

Next
न्हा पराभवाची नामुष्की
दुसरी कसोटी : ऑस्ट्रेलियाची भारतावर चार गड्यांनी मात, मालिकेत २-० ने आघाडी
देशाबाहेर साडेतीन वर्षांत १५ वा पराभव
विदेशात धोनीच्या नेतृत्वात भारताचा १४ वा पराभव
इंग्लंडमध्ये सात,ऑस्ट्रेलियात चार, न्यूझिलंड, द.आफ्रिकेत गमावला एकेक सामना.

ब्रिस्बेन : उसळी घेणाऱ्या खेळपट्ट्यांवर भारतीय फलंदाजांच्या उणिवा पुन्हा एकदा चव्हाट्यावर येताच ऑस्ट्रेलियाविरुद्धचा दुसरा कसोटी सामना देखील चार दिवसांत गमविण्याची नामुष्की ओढवून घ्यावी लागली. यजमान संघाने शनिवारी चार गड्यांनी हा सामना जिंकून चार सामन्यांच्या मालिकेत २-० ने निर्णायक आघाडी संपादन केली.
दिवसाचा प्रारंभ १ बाद ७१ वरून करणाऱ्या भारताचा दुसरा डाव २२४ धावांत संपला. सकाळी केवळ १६ धावांत चार गडी बाद झाले. सलामीचा फलंदाज शिखर धवन जखमी झाल्यानंतर पुन्हा एकदा मैदानात आला. त्याने झुंझार ८१ धावा केल्या. विजयासाठी हव्या असलेल्या १२८ धावांचा पाठलाग करणाऱ्या ऑस्ट्रेलियाने सहा गड्यांच्या मोबदल्यात १३० धावा करीत सामना जिंकला. कोहली(१) हा अपयशी ठरताच मिशेल जॉन्सनने भेदक मारा करीत चार गडी बाद केले. हेजलवुड, स्टार्क आणि नाथन लियॉन यांनी प्रत्येकी दोन गडी बाद करीत त्याला साथ दिली. धवन आणि उमेश यादव यांनी आठव्या गड्यासाठी ६० धावांची भागीदारी केली नसती तर टीम इंडियाला शंभर धावांचे आव्हान देणे अवघड झाले असते.
उभय संघांदरम्यान तिसरी कसोटी २८ डिसेंबरपासून मेलबोर्न येथे खेळली जाईल. भारताकडे या पराभवाचे कुठलेही कारण नाही. पंचांचे निर्णय मात्र संघाच्या विरोधात गेले. रोहित शर्मा आणि आर. अश्विन यांना पंचांनी झेलबाद दिले पण टीव्ही रिप्लेमध्ये चेंडू बॅटला घासून गेला नाही हे स्पष्ट होत होते. जॉन्सनने भारतीय फलंदाजीला खिंडार पाडली. त्याने ११ चेंडूंवर दहा धावा देत तिघांना बाद केले. अश्विन आणि पुजारा यांनी पडझड थोपवित सहाव्या गड्यासाठी ३० धावांची भागीदारी केली तर उमेश यादवने प्रत्येकी दोन चौकार आणि दोन षटकारांसह ३० धावांचे योगदान देत २०० चा पल्ला गाठून दिला. जॉन्सनने यादवला यष्टिरक्षक हॅडिनकडे झेल देण्यास भाग पासून भारताचा डाव संपुष्टात आणला.(वृत्तसंस्था)
....................................

Web Title: India defeats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.