India Defence Export: भारत नुसती आयातच करत नाही, अमेरिकेलाही शस्त्रास्त्रे पुरवितो; फिलिपिन्ससोबत ब्राम्होस डील

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2022 03:23 PM2022-01-31T15:23:25+5:302022-01-31T15:24:15+5:30

ब्रह्मोस क्षेपणास्त्राची गणना जगातील सर्वात वेगवान सुपरसॉनिक क्षेपणास्त्रांमध्ये केली जाते. हे भारत आणि रशियाने संयुक्तपणे बनवले आहे. ते जमीन, पाणी आणि हवेतून सोडले जाऊ शकते.

India defense exports: India not only imports, it also supplies arms to US; BrahMos deal with the Philippines | India Defence Export: भारत नुसती आयातच करत नाही, अमेरिकेलाही शस्त्रास्त्रे पुरवितो; फिलिपिन्ससोबत ब्राम्होस डील

India Defence Export: भारत नुसती आयातच करत नाही, अमेरिकेलाही शस्त्रास्त्रे पुरवितो; फिलिपिन्ससोबत ब्राम्होस डील

Next

ब्राह्मोस सुपरसॉनिक क्षेपणास्त्रासाठी भारत आणि फिलीपिन्समध्ये करार झाला आहे. हा करार $374.9 दशलक्ष (रु. 27.89 अब्ज) मध्ये झाला आहे. आत्मनिर्भर भारताच्या दिशेने हे एक मोठे पाऊल आहे. अहवालानुसार, ब्रह्मोससाठी ही पहिली विदेशी ऑर्डर आहे.

ब्रह्मोस क्षेपणास्त्राची गणना जगातील सर्वात वेगवान सुपरसॉनिक क्षेपणास्त्रांमध्ये केली जाते. हे भारत आणि रशियाने संयुक्तपणे बनवले आहे. ते जमीन, पाणी आणि हवेतून सोडले जाऊ शकते. या क्षमतेला ट्रायड म्हणतात. संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, ब्रह्मोसचा वेग 2.8 मॅक आहे. या क्षेपणास्त्राची मारक क्षमता 290 किमी आहे. ते 300 किलो वजनी युद्ध साहित्य वाहून नेऊ शकते. या करारामुळे भारत आंतरराष्ट्रीय शस्त्रास्त्रांच्या व्यापारामध्ये पाय रोवू लागला आहे. 

भारत हा जगातील दुसरा सर्वात मोठा शस्त्रास्त्रे आयात करणारा देश आहे. परंतू तुम्हाला माहितीये का, की भारत शस्त्रे निर्यात देखील करतो. भारतातील शस्त्र सामुग्री अमेरिकाही विकत घेते. भारत अमेरिकेसह ८४ देशांना शस्त्रास्त्रे विकतो. 

  • भारत 34 देशांमध्ये बुलेट प्रूफ जॅकेट आणि हेल्मेटची निर्यात करतो. यामध्ये इस्रायल, जपान, जर्मनी, ब्रिटन, अमेरिका आणि सौदी अरेबिया या देशांचा समावेश आहे.
  • भारत ४ देशांना आर्मर शील्ड निर्यात करतो. यामध्ये जर्मनी, मेक्सिको, कंबोडिया आणि सौदी अरेबियाचा समावेश आहे.
  • 23 देशांना बंदुकीचे सुटे भाग विकले जातात. त्यामध्ये अमेरिका, युक्रेन, सौदी अरेबिया, ऑस्ट्रेलिया, अर्जेंटिना, कॅनडा, इटली आणि इस्रायल सारखे देश आहेत.
  • भारताने नेपाळ, मालदीव आणि मॉरिशसला ALH (ध्रुव) हेलिकॉप्टरची निर्यात केली आहे. डॉर्नियर (Do-228) मॉरिशसलाही निर्यात करण्यात आले आहे. चेतक हेलिकॉप्टर नामिबिया, नेपाळ, मॉरिशस आणि सुरीनामला विकले गेले आहेत.
  • अमेरिका, ब्रिटन आणि फ्रान्ससह 5 देशांमध्ये इलेक्ट्रॉनिक्स व्यतिरिक्त सिंगापूर, श्रीलंका, बांगलादेश, इस्रायल आणि व्हिएतनाममध्ये बॅटरीची निर्यात केली आहे.
  • विमान उपकरणे अमेरिका, फ्रान्स, नेदरलँड, स्वीडन आणि यूके येथे निर्यात केली गेली आहेत. याशिवाय, ते यूएस, यूके, स्वीडन आणि नेदरलँड्सला अभियांत्रिकी सेवा देखील प्रदान करते.
     

Web Title: India defense exports: India not only imports, it also supplies arms to US; BrahMos deal with the Philippines

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.