चीनच्या ठोशाला ठोसा द्यायला भारत तयार, सर्जिकल स्ट्राइक करणारी स्पेशल फोर्स लडाखमध्ये तैनात

By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2020 08:30 PM2020-07-02T20:30:51+5:302020-07-02T20:41:02+5:30

स्पेशल फोर्सेसच्या या तुकड्या पूर्व लडाखमध्ये तैनात करण्यात आल्या आहेत. त्यांना त्यांच्या भूमिकेसंदर्भातही पूर्णपणे माहिती देण्यात आली आहे. भारतात 12 हून अधिक स्पेशल फोर्सेसच्या रेजिमेंट आहेत.

india deploys special forces in ladakh amid India china border dispute | चीनच्या ठोशाला ठोसा द्यायला भारत तयार, सर्जिकल स्ट्राइक करणारी स्पेशल फोर्स लडाखमध्ये तैनात

चीनच्या ठोशाला ठोसा द्यायला भारत तयार, सर्जिकल स्ट्राइक करणारी स्पेशल फोर्स लडाखमध्ये तैनात

Next
ठळक मुद्देभारताने लडाख सीमेवर स्पेशल फोर्सेस तैनात केल्या आहेत. स्पेशल फोर्सेसनी 2017मध्ये पाकिस्तानविरुद्ध केलेल्या सर्जिकल स्ट्राइकमध्ये महत्वाची भूमिका बजावली होती.आवश्यकता वाटलीच, तर यांचा उपयोग चीन विरोधातही केला जाऊ शकतो.

नवी दिल्ली - लडाख सीमेवर भारत-चीन तणाव प्रचंड वाढला आहे. आता भारतानेलडाख सीमेवर स्पेशल फोर्सेस तैनात केल्या आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देशाच्या विविध भागांतून पॅरा स्पेशल फोर्सच्या युनिट लडाखमध्ये पाठवण्यात आल्या आहेत. येथे त्यांचा सरावही सुरू आहे. स्पेशल फोर्सेसनी 2017मध्ये पाकिस्तानविरुद्ध केलेल्या सर्जिकल स्ट्राइकमध्ये महत्वाची भूमिका बजावली होती. एवढेच नाही, तर सूत्रांनी सांगितल्याप्रमाणे, आवश्यकता वाटलीच, तर यांचा उपयोग चीन विरोधातही केला जाऊ शकतो.

स्पेशल फोर्सेसच्या या तुकड्या पूर्व लडाखमध्ये तैनात करण्यात आल्या आहेत. त्यांना त्यांच्या भूमिकेसंदर्भातही पूर्णपणे माहिती देण्यात आली आहे. भारतात 12 हून अधिक स्पेशल फोर्सेसच्या रेजिमेंट आहेत. ज्या भारताच्या वेगवेगळ्या भागांत प्रशिक्षण घेतात. जम्मू आणि काश्मीरमध्ये तैनात स्पेशल फोर्सेसच्या तुकड्या लेहमध्ये आणि त्याच्या जवळपास उंचीच्या भागांत नियमितपणे युद्धसराव करत असतात.

भारत आणि चीन यांच्यातील तणावाला मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच सुरुवात झाली आहे. मात्र, 15 जूनला गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसक झटापटीनंत तो अधिक वाढला आहे. या झटापटीत भारताच्या 20 जवानांना हौतात्म्य आले होते. तर चीनने त्यांच्या मारल्या गेलेल्या सैनिकांसंदर्भात अद्याप आकडा जारी केलेला नाही. मात्र, अमेरिकन गुप्तचर संस्थेने दिलेल्या माहितीनुसार या झचापटीत चीनचे 35 हून अधिक सैनिक मारले गेले आहेत. 

भारत आणि रशियात 33 लढाऊ विमानांची डील -
चीनसोबतच्या लडाखमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्रालयाने रशियाकडून 33 लढाऊ विमाने खरेदी करण्याची घोषणा केली आहे. यासाठी 18 हजार 148 कोटी रुपये लागणार असल्याचे सांगण्यात आले आहे. या डीलनुसार भारत रशियाकडून सुखोई-30 आणि मिग-29 ही लढाऊ विमाने खरेदी करणार आहे. ही एकूण 33 लढाऊ विमाने असणार असून यामध्ये 12 सुखोई-30 आणि 21 मिग-29 विमाने आहेत. याशिवाय भारताकडे असलेल्या रशियन  लढाऊ विमानांना अद्ययावत करण्यात येणार आहे. ही मिग 29 ची 59 विमाने आहेत. 

अॅप बंद करून चीनला हादरा -
लडाखच्या सीमेवर भारत-चीन सैन्यात झालेल्या झटापटीत भारताच्या २० जवानांना हौतात्म्य आले. तर चीनच्या 35हून अधिक सैनिकांना भारतीय लष्कराने ठार केले. त्यानंतर देशभरात चीनविरोधात संतापाची लाट उसळली. याच पार्श्वभूमीवर चीनला धक्का देण्यासाठी मोदी सरकारने चीनच्या 59 अॅपवर बंदी घातली. मोदी सरकारच्या या कारवाईनंतर चीनला मोठा धक्का बसला आहे.

महत्त्वाच्या बातम्या -

आता कुरापतखोर चीनचा थेट रशियावरच डोळा, या 'मोठ्या' शहरावर सांगितला दावा!

भारतानंतर आता 'हा' देशही आक्रमक, चीनविरोधात मोर्चेबांधनीला केली सुरुवात

भारताकडे आहे 'अग्नीबाण', काही मिनिटांत बेचिराख होऊ शकतो चीन; 'ही' मोठी शहरं येतात थेट निशाण्यावर!

India China Standoff : चीनचा सामना करायला पुढच्याच महिन्यात येतंय राफेल, 'हे' बलाढ्य मित्र भारताला देणार घातक शस्त्रास्त्र

भारताच्या 'या' खास मित्रानं घेतला सैन्य तैनातीचा निर्णय, चीनला फुटला घाम; सुरू केली भारताची 'तारीफ पे तारीफ'

India-China faceoff: आता भारताला मिळाली या 'बलाढ्य' मित्राची साथ, चीनच्या 'घेराबंदी'ला सुरुवात; सामना करायला तयार

Web Title: india deploys special forces in ladakh amid India china border dispute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.