मसूद अझरवरील बंदी लांबल्यामुळे भारत नाराज
By admin | Published: April 2, 2016 11:33 AM2016-04-02T11:33:51+5:302016-04-02T11:36:42+5:30
पठाणकोटमधील भारतीय हवाई दलाच्या तळावरील दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माइंड व "जैश-ए-मोहम्मद‘चा प्रमुख मसूद अझर याच्यावरील बंदीला चीनने विरोध दर्शवला.
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २ - पठाणकोटमधील भारतीय हवाई दलाच्या तळावरील दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माइंड व "जैश-ए-मोहम्मद‘चा प्रमुख मसूद अझर याच्यावर बंदीला चीनने विरोध दर्शवला असून अझरवरील बंदीने लांबल्याने भारताने नाराजी दर्शवली आहे. 'मसूद अजहरच्या बंदीबाबत भारताने केलेल्या मागणीवर संयुक्त राष्ट्रसंघाच्या (यूएन) समितीने निर्णय लांबवल्याने आम्ही नाराज झालो आहोत' अशी प्रतिक्रिया भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी दिली. पठाणकोटच्या हवाई दलाच्या तळावर झालेल्या हल्ल्यात मसूद अझरचा सहभाग होता आणि हे भारतातर्फे सांगूनही त्याच्यावर अद्याप बंदीची कारवाई झालेली नाही. जगभरात जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे जाळे पसरले असून त्यामुळे मानवतेला धोका आहे, असेही ते म्हणाले.
दरम्यान चीनने पुन्हा एकदा मसूद अझरवर बंदी घालण्याच्या निर्णयाला विरोध दर्शवला आहे. याबाबतचा निर्णय त्वरित घेऊ नये, अशी विनंती चीनने "यूएन‘च्या समितीकडे केल्याने अझरवरील बंदी लांबणीवर पडली.