भारताला कोणत्याही देशाचा भूभाग नकोय

By admin | Published: October 3, 2016 04:13 AM2016-10-03T04:13:08+5:302016-10-03T04:13:08+5:30

भारताने कधी कुठल्या देशावर हल्ला केला नाही आणि कोणत्याही देशाचा भूभाग आम्हाला नकोय.

India does not want any country's territory | भारताला कोणत्याही देशाचा भूभाग नकोय

भारताला कोणत्याही देशाचा भूभाग नकोय

Next


नवी दिल्ली : भारताने कधी कुठल्या देशावर हल्ला केला नाही आणि कोणत्याही देशाचा भूभाग आम्हाला नकोय. उलट जागतिक महायुद्धात आमच्या दीड लाख जवानांनी दुसऱ्यांसाठी लढताना आपल्या प्राणाची आहुती दिली आहे, असे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले.
काश्मीरच्या मुद्यावर पाकिस्तान आंतरराष्ट्रीय स्तरावर आवाज उठवत असताना मोदी यांनी हे विधान केले आहे, हे विशेष. प्रवासी भारत केंद्राच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. मोदी म्हणाले की, विदेशातील भारतीय सत्ता मिळविण्यात किंवा राजकारणात सक्रीय होण्यात रस दाखवित नाही. याउलट सामाजिक सद्भावनेतून ते अन्य समुदायासोबत एकत्र राहतात. महायुद्धात आमच्या अनेक सैनिकांनी प्राणाहुती दिली. पण, देशाने या बलिदानाची जगाला कधी जाणीव करुन दिली नाही. आपण जेव्हा विदेशात जातो तेव्हा या सैनिकांच्या स्मारकाला आवर्जुन भेट देतो असेही ते म्हणाले.
ब्रेन ड्रेन (सुशिक्षित लोकांचे स्थलांतर) बाबत खूप काही बोलले गेले आहे. जर भारतीय समुदायाच्या मजबुतीला योग्य वळण दिले तर आम्ही याचे ‘ब्रेन गेन’मध्ये रुपांतर करु शकतो. नेपाळमध्ये भूकंपानंतर केलेली मदत आणि यमनमधील भारतीयांच्या सुटकेसाठी केलेल्या कामाबद्दल त्यांनी परराष्ट्र मंत्रालयाचे कौतुक केले. (लोकमत न्यूज नेटवर्क)
>आता मोदींची छाती ५६
नव्हे १०० इंचांची : चौहान
भोपाळ : पाकव्याप्त काश्मीरमध्ये लष्करी कारवाई (सर्जिकल आॅपरेशन) घडवून आणल्याबद्दल मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ५६ इंचांची छाती आता फुलून १०० इंचांची झाली आहे, अशा शब्दांत त्यांचे कौतूक केले. आता ही छाती ५६ इंचांची नव्हे तर १०० इंचांची बनली आहे, असे चौहान यांनी एमएसएमई अधिवेशनाच्या उद््घाटन कार्यक्रमात येथे म्हटले. आमच्या विकासाचा वेग हा चीनपेक्षा जास्त आहे. भारत किती सामर्थ्यशाली आहे हे तुम्ही नुकतेच बघितले आहे, असे ते म्हणाले. आमच्या लष्कराचे अभिनंदन, नरेंद्र मोदी-जी यांचे अभिनंदन. आता छाती ५६ इंचांची नव्हे तर १०० इंचांची आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
>४०० रेल्वे कर्मचाऱ्यांशी
मोदी थेट संवाद साधणार
पंतप्रधान मोदी रेल्वेच्या ४०० कर्मचाऱ्यांशी संपर्क साधणार आहेत तर व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे २० हजार जणांशी संवाद साधतील. रेल्वे हे देशाचे प्रमुख वाहतुकीचे साधन असून बदलत्या काळासोबत प्रवाशांच्या त्याकडून अपेक्षाही बदलल्या आहेत. त्यांची पूर्तता करण्यासाठी मोदी या संवादातून अभिनव कल्पना घेतील.

Web Title: India does not want any country's territory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.