Afghanistan Crisis: मिशन अफगाणिस्तान! भारतीयांना सुखरुप मायदेशी आणण्यासाठी जोरदार प्रयत्न; ७८ जणांना घेऊन विमान निघालं
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2021 09:15 AM2021-08-24T09:15:54+5:302021-08-24T09:16:31+5:30
Afghanistan Crisis: अफगाणिस्तानात तालिबान्यांनी कब्जा केल्यानंतर तेथील भारतीय नागरिकांना सुखरुपरित्या मायदेशात आणण्यासाठी भारत सरकारनं मोठी मोहिम हाती घेतली आहे.
Afghanistan Crisis: अफगाणिस्तानाततालिबान्यांनी कब्जा केल्यानंतर तेथील भारतीय नागरिकांना सुखरुपरित्या मायदेशात आणण्यासाठी भारत सरकारनं मोठी मोहिम हाती घेतली आहे. अफगाणिस्तानात अडकलेल्या भारतीयांना लवकरात लवकर भारतात आणण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. यातच एअर इंडियाचं १९५६ फ्लाइटमधून ७८ जणांना घेऊन आणखी एक विमान अफगाणिस्तानहून निघालं आहे. यात २५ भारतीयांचा समावेश आहे. या सर्वांना काबुलहून भारतात आणलं जात आहे. (India engaged in evacuating people from Afghanistan 78 passengers took flight from Dushanbe)
याआधी सोमवारी भारतीय आणि अफगाण शीखांसह ७० हून अधिक जणांना हवाई दलाच्या विमानातून भारतात आणलं गेलं. यासोबतच अफगाणिस्तानातून १४६ भारतीय नागरिक कतारहून विविध विमानांतून सोमवारी भारतात पोहोचले आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार १६ ऑगस्टपासून आतापर्यंत जवळपास ७३० जणांना भारतात सुखरुपरित्या आणण्यात आलं आहे. तर आणखी दोनशे ते तीनशे जण अफगाणिस्तानात अडकल्याची माहिती आहे. या सर्वांना लवकरात लवकर मायदेशी आणण्यासाठी भारत सरकार प्रयत्नशील आहे.
Helping in the safe return from Afghanistan.
— Arindam Bagchi (@MEAIndia) August 24, 2021
AI 1956 enroute to Delhi from Dushanbe carrying 78 passengers, including 25 Indian nationals. Evacuees were flown in from Kabul on an @IAF_MCC aircraft.@IndEmbDushanbepic.twitter.com/BcIWLzSLrL
अमेरिकेनं आतापर्यंत १०,९०० लोकांची केली सुटका
व्हाइट हाऊसकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार अमेरिकेकडून काबुलहून आतापर्यंत १०,९०० जणांची सुटका करण्यात आली आहे. अमेरिकन हवाई दलानं आतापर्यंत ६,६०० जणांची तर विविध प्रवासी विमानांमधून ४,३०० जणांना अफगाणिस्तानातून सुटका करण्यात आली आहे.