मोदींच्या परदेश दौऱ्यातून भारतात 'लक्षावधी मिलियन्स अमेरिकन डॉलरची गुंतवणूक'

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2018 10:44 AM2018-12-30T10:44:21+5:302018-12-30T10:47:09+5:30

मोदींच्या विदेश दौऱ्यातील खर्चावरुन विचारण्यात आलेल्या प्रश्नाला खासदार जनरल वि.के.सिंह यांनी राज्यसभेत उत्तर दिले

india fetch millions dollar investment from narendra modis foreign visit since 2014 | मोदींच्या परदेश दौऱ्यातून भारतात 'लक्षावधी मिलियन्स अमेरिकन डॉलरची गुंतवणूक'

मोदींच्या परदेश दौऱ्यातून भारतात 'लक्षावधी मिलियन्स अमेरिकन डॉलरची गुंतवणूक'

Next

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदेश दौऱ्यावरुन आणि त्यावर झालेल्या खर्चांवरुन सोशल मीडियावतून मोदींवर टीका करण्यात येते. तर, विरोधकही या गोष्टीच भांडवल आपल्या राजकीय स्वार्थासाठी करताना दिसतात. मात्र, मोदींचा विदेश दौरा म्हणजे केवळ पर्यटन नसून देशात मोठी गुंतवणूक ठरला आहे. राज्यसभेत खासदार वीके. सिंह यांनी याबाबत माहिती दिली.  

मोदींच्या विदेश दौऱ्यातील खर्चावरुन विचारण्यात आलेल्या प्रश्नाला खासदार जनरल वि.के.सिंह यांनी राज्यसभेत उत्तर दिले. त्यावेळी, मोदींनी ज्या देशांना भेटी दिल्या, त्या देशांतून मोठी गुंतवणूक भारतात झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. विशेष म्हणजे भारतात गुंतवणूक करणाऱ्या देशांपैकी ते देश टॉप 10 मध्ये असल्याचंही सिंह यांनी सांगितले. यापूर्वी 2011 ते 2014 या कालावधीत अमेरिकेने भारतात 81 हजार 843.21 मिलियन्स डॉलरची गुंतवणूक केली होती. तर, मोदी सरकारच्या 2014 ते 2018 या कालावधीत ही गुंतवणूक 1 लाख 36 हजार 77.75 कोटी मिलियन्स डॉलर एवढी वाढली आहे. 

देशात 2017 पर्यंत झालेल्या एकूण परदेशी गुंतवणुकीचा विचार केल्यास किंवा एफडीआयची आकडेवारी पाहिल्यास एकूण गुंतवणूक 43 हजार 478.27 मिलियन्स अमेरिकी डॉलर एवढी आहे. सन 2014 साली ही गुंतवणूक 30 हजार 930.5 मिलियन्स डॉलर एवढी होती. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या 55 महिन्यांच्या कार्यकाळात 48 परदेश दौरे केले असून 92 देशांना भेटी दिल्या आहेत.   

Web Title: india fetch millions dollar investment from narendra modis foreign visit since 2014

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.