देशी युद्धनौका INS Vikrant मारणार अथांग समुद्रात सूर; 26 लढाऊ विमानांसह चाचणी सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2020 03:15 PM2020-08-22T15:15:37+5:302020-08-22T15:36:54+5:30
भारताची पहिली स्वदेशी युद्धनौका आयएनएस विक्रांत लवकरच चाचणीनंतर हिंद महासागर आणि बंगालच्या उपसागर यांच्या दरम्यान तैनात केली जाणार आहे.
नवी दिल्ली - भारताची पहिली स्वदेशी युद्धनौका आयएनएस विक्रांत लवकरच चाचणीनंतर हिंद महासागर आणि बंगालचा उपसागर यांच्या दरम्यान तैनात केली जाणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आयएनएस विक्रांतची हार्बर चाचणी पूर्ण झाली आहे. त्याचबरोबर लवकरच याची बेसिनची चाचणीही सुरू केली जाईल. स्वदेशी युद्धनौका आयएनएस विक्रांत 2023 पर्यंत नौदलात सामील होऊ शकते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आयएनएस विक्रांतच्या हार्बर चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. मात्र कोरोनाच्या संकटामुळे त्याच्या बेसिन चाचण्यांना उशीर झाला आहे. बेसिन चाचण्यांमध्ये बसवलेल्या सर्व उपकरणांची चाचणी केली जाते व जहाज समुद्रात उतरण्यास सक्षम आहे की नाही याचा अभ्यास केला जातो. भारतीय नौदलाने विशाखापट्टणममध्ये आयएनएस विक्रांत तैनात करू इच्छित असल्याचं सांगितलं आहे.
रशियाकडून खरेदी केलेली युद्धनौका आयएनएस विक्रमादित्य पश्चिम किनाऱ्यावर कारवार येथे तैनात करण्यात आली आहे. आयएनएस विक्रांतची लांबी 262 मीटर आहे. फेब्रुवारी 2009मध्ये कोचीन शिपयार्डमध्ये हे तयार करण्याची सुरुवात झाली होती. या युद्धनौकेवर 26 लढाऊ विमाने आणि 10 हेलिकॉप्टर ठेवता येणार आहेत. सध्या यावर मल्टीरोल लढाऊ विमान मिग 29 तैनात केले जाणार आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
Sushant Singh Rajput Case : सुशांतच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमधील वेळेचा कॉलम रिकामा का?, AIIMSच्या डॉक्टरांचा सवालhttps://t.co/6qtvn466Te#SushantSinghRajputCase#SushantSinghRajputDeathCase#CBI
— Lokmat (@MiLOKMAT) August 22, 2020
मोबाईल बँकिंग दरम्यान 'या' गोष्टींची घ्या काळजीhttps://t.co/a9UglYYDOH#SBI
— Lokmat (@MiLOKMAT) August 22, 2020
महत्त्वाच्या बातम्या
मोबाईल बँकिंगमध्ये फ्रॉडचा धोका, SBI ने दिला खातेदारांना मोलाचा सल्ला
19 वर्षांचं नातं काही सेकंदांत तुटलं! WhatsApp वरून दिला पत्नीला तलाक
मोठी कारवाई! दिल्लीच्या धौला कुआंमध्ये चकमक, ISIS च्या एका दहशतवाद्याला अटक, स्फोटकांचा साठा जप्त
"... आम्हाला वेगळ्याच गोष्टी सांगितल्या, मोदी खोटं बोलत नाहीत असा एकही दिवस नाही"