‘भारताने जन्म दिला, पण इस्रायलने...’; नर्स प्रमिलाचा मायदेशी परतण्यास नकार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2023 09:41 AM2023-10-11T09:41:58+5:302023-10-11T09:42:24+5:30

भारतातील माझ्या मुलांची खूप आठवण येते, पण...

India gave birth but Israel gave life Nurse Pramila's refusal to return home | ‘भारताने जन्म दिला, पण इस्रायलने...’; नर्स प्रमिलाचा मायदेशी परतण्यास नकार

‘भारताने जन्म दिला, पण इस्रायलने...’; नर्स प्रमिलाचा मायदेशी परतण्यास नकार

‘भारताने मला जन्म दिला, पण इस्रायलने जीवन दिले. संकटकाळात मी त्यांना सोडून जाऊ शकत नाही. भारतातील माझ्या मुलांची खूप आठवण येते, पण इस्त्रायलींची मदत करायची आहे’, असे म्हणत मूळ कर्नाटकच्या उडुपी जिल्ह्याची रहिवासी आणि गेल्या ६ वर्षांपासून इस्रायलच्या तेल अवीव याफो येथे नर्स म्हणून कार्यरत असलेल्या प्रमिला प्रभू (४१) यांनी भारतात परतण्यास स्पष्ट नकार दिला.  

इस्रायलमध्ये अडकलेल्या अनेक भारतीयांमध्ये प्रमिलाचाही समावेश आहे. ‘शनिवारी रात्री ८:३० वाजता सायरन वाजयला लागताच मी अपार्टमेंटच्या तळघरातील बंकरकडे धाव घेतली. तेल अवीव याफोमध्ये अन्य शहरांच्या तुलनेत हल्ल्याचा तितकासा परिणाम नसला तरी तेव्हापासून मी तीन वेळा बंकरमध्ये गेली आहे. एवढ्या प्रमाणात प्रचंड हिंसाचार मी कधीच पाहिला नाही’, असे प्रमिला यांनी सांगितले. प्रमिलाची बहीण प्रवीणादेखील जेरुसलेममध्ये रुग्णालयात नर्स आहे.

‘भारतातून कुटुंबीय काळजीपोटी दिवसातून सतत फोन करतात. दोन मुलांना (मुलगा, १३ आणि मुलगी, ८) सोडून राहणे सोपे नाही’ अशी कबुलीही प्रमिलांनी दिली. ‘मुलांची खूप आठवण येते पण याचा अर्थ असा नाही की, मी संकटकाळात इथून पळून जावे. परिस्थिती निवळल्यावर भारतात परतेन. मात्र, आता मी इस्रायल सरकारच्या आवश्यकतेनुसार मदत करेन’, असे प्रमिला म्हणाल्या. सोशल मीडियावर त्यांची मुलाखत व्हायरल झाली असून, कौतुकाचा वर्षाव होत आहे.
 

Web Title: India gave birth but Israel gave life Nurse Pramila's refusal to return home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.