कौशल्य विकास, नदी शुद्धिकरण क्षेत्रात भारत-र्जमनी सहकार्य

By Admin | Published: September 9, 2014 03:44 AM2014-09-09T03:44:16+5:302014-09-09T03:44:16+5:30

भारत आणि र्जमनी कौशल्य विकास, घन कचरा प्रबंधन आणि नद्या शुद्धीकरण करण्याच्या क्षेत्रात परस्पर सहकार्य करण्यास सहमत झाले आहेत.

India-German cooperation in skill development, river purification | कौशल्य विकास, नदी शुद्धिकरण क्षेत्रात भारत-र्जमनी सहकार्य

कौशल्य विकास, नदी शुद्धिकरण क्षेत्रात भारत-र्जमनी सहकार्य

googlenewsNext

नवी दिल्ली : भारत आणि र्जमनी कौशल्य विकास, घन कचरा प्रबंधन आणि नद्या शुद्धीकरण करण्याच्या क्षेत्रात परस्पर सहकार्य करण्यास सहमत झाले आहेत.
भारताच्या दौर्‍यावर आलेले र्जमनीचे परराष्ट्रमंत्री डॉ. वॉल्टर स्टेनयेयर यांनी सोमवारी नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यानंतर मोदी यांनी 'र्जमनी आणि भारत एकमेकांसाठीच बनलेले आहेत,' असे मत व्यक्त केले. मोदींशी भेटताना स्टेनमेयर यांनी द्विपक्षीय संबंध अधिक विस्तारित आणि सुदृढ बनविण्यासाठी भारतातील नव्या सरकारसोबत मिळून काम करण्याची र्जमनीची इच्छा असल्याचे जाहीर केले. हनोव्हर मेसे-२0१५ मध्ये सहभागी होण्याचे र्जमनीच्या चान्सलर मार्केल यांचे निमंत्रण स्वीकार करण्याच्या भारताच्या निर्णयाचे स्टेनयेयर यांनी स्वागत केले.
स्टेनमेयर यांच्याशी चर्चेदरम्यान नरेंद्र मोदी म्हणाले, 'लोकशाही मूल्यांशी बांधील असलेले भारत आणि र्जमनी हे दोन्ही देश एकमेकांसाठीच बनलेले आहेत. दोन्ही देश पूरक कौशल्य आणि संसाधनांच्या कारणांची निर्मिती आणि पायाभूत विकासात सहकार्य करून औद्योगिक विकासाच्या पुढच्या पिढीला ताकद देऊ शकतात.' कौशल्य विकास क्षेत्रातील र्जमनीची ताकद आणि अनुभवाचा लाभ घेऊन दोन्ही देशांनी भारताची गरज आणि कुशल मानव संसाधनाची वैश्‍विक गरज भागविण्यासाठी भारतीय युवकांची एक ठोस प्रशिक्षण योजना विकसित करावी, अशी सूचना मोदी यांनी यावेळी केली.
भारत आणि र्जमनीतील हे सहकार्य यापुढे स्वच्छ ऊर्जा क्षेत्रातही घेऊन जाण्यावर मोदी यांनी या भेटीत भर दिला, असे एका निवेदनात म्हटले आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: India-German cooperation in skill development, river purification

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.