Corona Vaccination: देशात कोरोनाचा कहर! मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; लवकरच घोषणा?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2021 08:37 AM2021-04-12T08:37:52+5:302021-04-12T08:38:07+5:30

Corona Vaccination: देशात सध्याच्या घडीला कोरोनावरील दोन लसींचा वापर; लवकरच आणखी लसींना परवानगी मिळण्याची शक्यता

india to get 5 more covid vaccines by october sputnik v clearance might get approval in 10 days | Corona Vaccination: देशात कोरोनाचा कहर! मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; लवकरच घोषणा?

Corona Vaccination: देशात कोरोनाचा कहर! मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; लवकरच घोषणा?

Next

नवी दिल्ली: गेल्या महिनाभरापासून देशातील कोरोना बाधितांचा आकडा झपाट्यानं वाढत आहे. गेल्या सहा दिवसांपासून देशात दररोज कोरोनाच्या १ लाखाहून अधिक रुग्णांची नोंद होत आहे. त्यामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली असून अनेक भागांमध्ये कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यातच कोरोना लसींचा तुटवडा जाणवत असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे केंद्र सरकार आणखी पाच लसींना मंजुरी देण्याची शक्यता आहे. वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीच्या अखेरपर्यंत याबद्दलचा निर्णय घेतला जाऊ शकतो.

फक्त १० दिवसात भारताला मिळणार तिसरी कोरोनाची लस; लसीच्या तुटवड्यावर आरोग्यमंत्र्यांची माहिती

देशात सध्याच्या घडीला दोन लसींचा वापर केला जात आहे. कोविशील्ड आणि कोवॅक्सिन लसींचा वापर देशभरात सुरू आहे. देशात लसीकरणानं वेग घेतला असला तरी रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. त्यामुळे लसींचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळेच आणखी पाच लसींना लवकरच मान्यता दिली जाईल, अशी माहिती एएनआय वृत्तसंस्थेनं सरकारमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हवाल्यानं दिलं आहे. 

रेमडेसिविरच्या निर्यातीला बंदी, केंद्र सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

नव्या लसींमध्ये डॉ. रेड्डीजच्या सहकार्यानं तयार होत असलेल्या स्पुटनिक व्ही, बायोलॉजिकल ईच्या सहकार्यानं तयार होत असलेली जॉन्सन अँड जॉन्सनची लस, सीरम इंडियाच्या सहकार्यानं तयार होत असलेल्या नोवोवॅक्स, झायडस कॅडिला आणि भारत बायोटेकच्या इंट्रानसल यांचा समावेश आहे. कोरोना लसींच्या आपत्कालीन वापरास परवानगी दिली जात असताना केंद्र सरकारकडून सुरक्षा आणि परिणामकारकता यांचा प्राधान्यानं विचार केला जातो.

रशियाच्या स्पुटनिक व्ही लसीला पुढील १० दिवसांत मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. लसीच्या उत्पादनासाठी रशियन प्रत्यक्ष गुंतवणूक निधी (आरडीआयएफ) आणि हैदराबादस्थित विरचो बायोटेक यांनी एक करार केला. त्यानुसार २० कोटी लसींचं उत्पादन करण्यात येईल. स्पुटनिक व्हीच्या ८.५ कोटी लसी भारताला मिळतील. सुत्रांच्या माहितीनुसार, जूनपर्यंत स्पुटनिक लस उपलब्ध होऊ शकेल. त्यानंतर जॉन्सन अँड जॉन्सन आणि झायडस कॅडिलाची लस ऑगस्टपर्यंत, तर नोवोवॅक्स सप्टेंबरपर्यंत आणि नसल लस ऑक्टोबरपर्यंत उपलब्ध होऊ शकेल.

Web Title: india to get 5 more covid vaccines by october sputnik v clearance might get approval in 10 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.