भारताला लागली पांढऱ्या सोन्याची लॉटरी! या महत्वाच्या गोष्टींमध्ये होतो वापर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2023 09:28 AM2023-02-11T09:28:02+5:302023-02-11T09:29:26+5:30

लिथिमय आयन बॅटरीचा वापर अक्षय ऊर्जा साठविण्यासाठी केला जातो. त्यामुळे कधी काळी ज्याला काडीचीही किंमत नव्हती, ते क्रांतिकारी शोधामुळे ‘सोने’ बनले आहे.

India got a white gold lottery It is used in important things | भारताला लागली पांढऱ्या सोन्याची लॉटरी! या महत्वाच्या गोष्टींमध्ये होतो वापर

भारताला लागली पांढऱ्या सोन्याची लॉटरी! या महत्वाच्या गोष्टींमध्ये होतो वापर

googlenewsNext

स्मार्टफोन, इलेक्ट्रिक वस्तू असो अथवा साधी कार किंवा कोणतेही बॅटरीवर चालणारे उत्पादन. या सर्वांमध्ये एका वस्तूचा वापर केला जातो, तो म्हणजे लिथियम. या लिथियममुळेच रशिया-युक्रेनशी युद्ध करत आहे. युक्रेनच्या जमिनीखाली पांढऱ्या सोन्याचे म्हणजेच लिथियमचे अफाट साठे दडलेले आहेत. जगात लिथियमचे महत्त्व वाढत असतानाच, भारतात त्याचे साठे आढळल्याने भारताला मोठी लॉटरीच लागली आहे.

कशामुळे आली किंमत? 
पुढील काही वर्षांमध्ये ऊर्जेसाठी लिथियम आयन बॅटरी हा प्रमुख स्रोत राहणार आहे. जगातील प्रमुख देश पेट्रोलियम उत्पादनांवरील आपली गरज कमी करत आहेत. यात लिथियमचे मोठे योगदान आहे. 

लिथिमय आयन बॅटरीचा वापर अक्षय ऊर्जा साठविण्यासाठी केला जातो. त्यामुळे कधी काळी ज्याला काडीचीही किंमत नव्हती, ते क्रांतिकारी शोधामुळे ‘सोने’ बनले आहे.

लिथियमचा वापर कुठे? 
- लिथियम आयन बॅटरीमध्ये 
- स्मार्टफोन 
- इलेक्ट्रिक कार
- लॅपटॉप

निर्यातदार कोण? 
चीन, चिली, अमेरिका, रशिया, नेदरलँड.
आयातदार कोण? 
दक्षिण कोरिया, जपान, बेल्जियम, भारत, जर्मनी.

किंमत किती? 
मागणी वाढल्याने लिथियमच्या किमतीत गेल्या वर्षी चारपट वाढ झाली आहे. ३० पट लिथियमची मागणी २००० ते २०१५ दरम्यान वाढली आहे. प्रत्येक देशात इलेक्ट्रिक वाहनांना मागणी वाढल्याने हा परिणाम दिसून येत आहे. तसेच, २०४० पर्यंत, स्वच्छ ऊर्जेसाठी ९०% लिथियमचा वापर केला जाईल, असा अंदाज आहे.

- १५ अब्जांवर हा आकडा पोहोचण्याचा - २०२७ पर्यंत अंदाज 
- ७ अब्ज लिथियम आयन बॅटरी दरवर्षी जगभरात विक्री केल्या जातात.

Web Title: India got a white gold lottery It is used in important things

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.