कारगिल युद्धात भारताने पाकिस्तानचा एअरबेस नेस्तनाबूत करण्याची केली होती तयारी

By admin | Published: July 20, 2016 09:35 AM2016-07-20T09:35:03+5:302016-07-20T12:15:34+5:30

भारत आणि पाकिस्तानमध्ये 1999 मध्ये झालेल्या कारगिल युद्धादरम्यान भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या एअरबेसवर बॉम्बहल्ला करण्याची तयारी केली होती

India had planned to destroy Pakistan's airbase in the Kargil war | कारगिल युद्धात भारताने पाकिस्तानचा एअरबेस नेस्तनाबूत करण्याची केली होती तयारी

कारगिल युद्धात भारताने पाकिस्तानचा एअरबेस नेस्तनाबूत करण्याची केली होती तयारी

Next
>ऑनलाइन लोकमत - 
नवी दिल्ली, दि. 20 - भारत आणि पाकिस्तानमध्ये 1999 मध्ये झालेल्या कारगिल युद्धादरम्यान भारतीय हवाई दलाने पाकिस्तान एअरबेसवर बॉम्बहल्ला करण्याची तयारी केली होती. 13 जूनला हल्ल्याची सर्व तयारी पुर्ण झाली होती. भारतीय हवाई दल संपुर्ण ताकदीनिशी पाकिस्तानी सीमारेषेपासून दूर असलेल्या एअरबेसवर हल्ला करणार होतं. मात्र हल्ला करण्याची सूचना न मिळाल्याने ही योजना रद्द करावी लागली.
 
एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार पाकिस्तानमधील सर्व ठिकाणं भारतीय हवाई दलाच्या निशाण्यावर होती. 16 विमानं पुर्ण तयार ठेवण्यात आली होती. हल्ला करण्याचा मार्गही तयार होता. सर्व वैमानिकांना खासगी रिव्हॉल्वर लोड करुन ठेवण्यास सांगण्यात आलं होतं. वैमानिकांजवळ पाकिस्तानी चलनाचीदेखील व्यवस्था करुन ठेवण्यात आली होती. जेणेकरुन आपातकालीन परिस्थितीत विमानातून उतरावं लागलं तर त्यांना सुरक्षित निघता यावं. 
 
जर भारताकडून हा हल्ला झाला असता तर दोन्ही देशांत खुप मोठं युद्ध पेटलं असत. पाकिस्तानकडून वारंवार होणा-या हल्ल्यांमुळे दोन्ही देशाचे तत्कालीन पररारष्ट्र मंत्री जसवंत सिंह आणि सरतात अझीज यांच्यामधील संवादप्रक्रिया बंद झाली होती. यानंतरच भारतीय हवाई दलाने ही योजना आखली होती. युद्ध थांबवायचं असेल तर कारगीलमधी पाकिस्तानी घुसखोरांना हटवण्यात यावं, तसंच कॅप्टन सौरभ कालिया यांच्यासोबत 6 जवानांचे हाल करणा-यांना शिक्षा दिली जावी असा स्पष्ट संदेश सरतात अझीज यांना देण्यात आला होता. 
 
भारतीय हवाई दलाच्या कागदपत्रांमध्ये याची नोंददेखील आहे. संवादप्रक्रिया अयशस्वी झाल्यानंतर 12 जूनला सरताज अझीज माघारी गेले होते. 13 जूनला हल्ल्याची योजना आखण्यात आली होती. हवाई दलाच्या 17 स्क्वॉड्रन  डायरीत याची नोंद आहे. 1971 नंतप प्रथमच भारतीय हवाई दल पाकिस्तानवर हल्ला करणार होतं. सकाळी 4.30 वाजेपर्यंत सर्वजण तयारीत होती. पण कोणतीच सूचना आली नाही. 12.30 वाजेपर्यंत वाट पाहण्यात आली, मात्र सूचना न आल्याने हल्ल्याची योजना रद्द करण्यात आली. 
 

Web Title: India had planned to destroy Pakistan's airbase in the Kargil war

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.