भारताकडे सद्य:स्थितीत सोन्याचा ६०७ टन साठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 04:43 AM2019-03-13T04:43:58+5:302019-03-13T04:44:54+5:30
जगात भारताचा ११ वा क्रमांक
मुंबई : सोन्याचा सर्वात मोठा ग्राहक असलेल्या भारताकडे सध्या ६०७ टन सोन्याचे भंडार असून यात भारताचा ११ वा क्रमांक आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे २,८१४ टन सोने असून त्यांचा साठ्यात तिसरा क्रमांक आहे.
अमेरिकेकडे ८,१३३.५ टन सोने, जर्मनी ३,३६९.७ टन, इटली आणि फ्रान्स २४०० टन सोनेसाठा असून ते पाचव्या क्रमांकावर आहेत. चीन आणि जपान या देशांकडे भारताच्या तुलनेत चांगला साठा आहे. चीनकडे १,८६४.३ टन तर, जपानकडे ७६५.२ टन सोने आहे. मार्केट इंटेलिजन्सचे संचालक एलिस्टेयर हेविट म्हणाले की, २०१८ मधील सोन्याच्या भंडारात झालेल्या वृद्धीनंतर २०१९ च्या सुरुवातील केंद्रीय बँकांकडे चांगल्या प्रमाणात सोने आहे. ४८ टन सोन्याच्या खरेदीनंतर आणि १३ टन विक्रीनंतर जागतिक सोन्याचे भंडार जानेवारीत ३५ टनांनी वाढले. यात ९ केेंद्रीय बँकांच्या वृद्धीचा समावेश आहे. २००२ पासूनची ही सर्वात मोठी वाढ आहे.
कोणत्या देशांकडे आहे भरमसाठ सोने
अमेरिका- ८,१३३ टन
जर्मनी- ३,३६९ टन
नाणेनिधी- २,८१४ टन
इटली व फ्रान्स- २,४०० टन
टॉप २0 मध्ये
तैवान, पोर्तुगाल, कझाकिस्तान, उझबेकिस्तान, सौदीअरब, ब्रिटन, लेबनॉन आणि स्पेनसारख्या देशांचा सोन्याचा साठा असलेल्या टॉप २० देशांमध्ये समावेश आहे. पाकिस्तानकडे ६४.६ टन सोने असून त्यांचा क्रमांक ४५ वा आहे.