'भारताकडे कोरोना व्हायरसवर प्रतिबंधक लस शोधण्याची क्षमता'
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2020 10:20 AM2020-03-05T10:20:09+5:302020-03-05T10:21:00+5:30
कोरोना व्हायरसपासून देशातील सर्व कुटुंबांनी सावध व्हायला हवे. सर्दी, ताप आणि खोकला असेल तर लगेच घाबरून जावू नये. हा साधा तापही असू शकतो. मात्र प्रत्येकाने आपले हात हँडवॉशनेच धुवावे, असंही गुलेरिया यांनी सांगितले.
नवी दिल्ली - जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. या व्हायरसमुळे मृत्यूमुखी पडलेल्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. भारतात देखील कोरोनाग्रस्तांची संख्या 29 झाली आहे. तर जगभरात तीन हजारहून अधिक लोकांना आपला जीम गमवावा लागला आहे. त्यातच एआयआयएमएसचे निर्देशक रणदीप गुलेरिया यांनी भारताकडे कोरोना व्हायरसशी लढण्याची आणि त्याच्यावर प्रतिबंधक लस शोधण्याची क्षमता असल्याचे म्हटले आहे.
कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी आवश्यक लस विकसीत करण्यासाठी 9 ते 10 महिन्यांचा कालावधी लागेल. सध्या देशात विपूल प्रमाणात टेस्टींग लॅब असून आपतकालीन टीम देखील उपलब्ध असल्याचे गुलेरिया यांनी सांगितले.
गुलेरिया पुढे म्हणाले की, कोरोना व्हायरसशी दोन हात करण्यासाठी सर्व राज्य सरकारांना जबाबदारी सोपवावी लागेल. तसेच त्यांच्या सोयी सुविधांना अपडेट करण्याची आवश्यकता आहे. जेणे करून रग्णांना योग्य उपचार मिळतील. कोरोना व्हायरसची बाधा झालेल्यांपैकी 80 टक्के रुग्णांना थोड्या प्रमामात अशक्तपणा येतो. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता नसते. तर काही रुग्णांची स्थिती गंभीर असते, असंही गुलेरिया यांनी सांगितले.
दरम्यान कोरोना व्हायरसपासून देशातील सर्व कुटुंबांनी सावध व्हायला हवे. सर्दी, ताप आणि खोकला असेल तर लगेच घाबरून जावू नये. हा साधा तापही असू शकतो. मात्र प्रत्येकाने आपले हात हँडवॉशनेच धुवावे, असंही गुलेरिया यांनी सांगितले.