Covishield row Britain: कोव्हिशिल्डचा वाद इरेला पेटला! भारतानेही युकेच्या प्रवाशांवर लादले निर्बंध

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2021 05:49 PM2021-10-01T17:49:51+5:302021-10-01T17:50:26+5:30

covishield row Britain : गेल्या महिन्यात कोव्हिशिल्ड घेतलेल्या भारतीय प्रवाशांवर बंदी घालण्याचा निर्णय ब्रिटनने घेतला होता. वादानंतर भारतीय प्रवाशांना सक्तीचे १५ दिवसांचे क्वारंटाईन करण्यास मान्यता दिली होती.

India has decided to impose reciprocity on UK nationals, three times RTPCR test, quarantine | Covishield row Britain: कोव्हिशिल्डचा वाद इरेला पेटला! भारतानेही युकेच्या प्रवाशांवर लादले निर्बंध

Covishield row Britain: कोव्हिशिल्डचा वाद इरेला पेटला! भारतानेही युकेच्या प्रवाशांवर लादले निर्बंध

Next

गेल्या महिन्यात कोव्हिशिल्ड घेतलेल्या भारतीय प्रवाशांवर बंदी घालण्याचा निर्णय ब्रिटनने घेतला होता. यानंतर टीका झाल्यावर भारतीय कोरोना लसीकरण प्रमाणपत्रावर आक्षेप घेत त्यावर विश्वास नसल्याचे सांगितले होते. भारताने आम्हीपण कारवाई करू असे म्हटल्यावर भारतीय प्रवाशांना सक्तीचे १५ दिवसांचे क्वारंटाईन करण्यास मान्यता दिली होती. आता भारताने युकेच्या प्रवाशांवर निर्बंध लादले आहेत. (UK nationals arriving in India from the UK will have to undergo mandatory quarantine at home or in the destination address for 10 days after the arrival: Sources)

पुण्यात सीरम इन्स्टिट्यूट बनवत असलेली कोव्हिशिल्ड लस ही ब्रिटनच्याच ऑक्सफर्ड विद्यापीठाने आणि एका बड्या कंपनीने निर्माण केलेली आहे. ब्रिटनने करारानुसार करोडो डोस भारतातून आयात केले आणि त्यांच्या नागरिकांना दिले आहेत. तरी देखील गेल्या महिन्यात ब्रिटनने कोव्हिशिल्ड लस घेतलेल्या भारतीय नागरिकांना प्रवेश नाकारला होता. यामुळे मोठा वाद झाला होता. भारताने आपणही तशीच कारवाई करू असा इशारा दिला होता. प्रचंड टीका सहन करावी लागल्यानंतर ब्रिटनने नमते घेत कोव्हिशिल्डवर आक्षेप नाही तर भारताच्या डिजिटल प्रमाणपत्रावर असल्याचे म्हटले होते. तसेच भारतीयांना सक्तीचे क्वारंटाईन रहावे लागेल तरच प्रवेश मिळेल असे म्हटले होते. 



 

आज भारताने देखील या वादावर कारवाई करत युकेहून येणाऱ्या प्रवाशांना 10 दिवसांच्या सक्तीचे क्वारंटाईन करण्यात येणार आहे. तसेच त्यांना लसीकरण प्रमाणपत्र, ७२ तासांपूर्वी केलेली आरटीपीसीआर टेस्ट, भारतात उतरल्यानंतर विमानतळावर टेस्ट आणि पुन्हा ८ दिवसांनी आरटीपीसीआर टेस्ट करावी लागणार आहे. हे नियम 4 ऑक्टोबरपासून लागू होणार असल्याचे सुत्रांनी सांगितले. 

Web Title: India has decided to impose reciprocity on UK nationals, three times RTPCR test, quarantine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.