अरुणाचल प्रदेशात भारतानं केलं मोठं काम, चीनला झोंबली मिर्ची; सुरू केला थयथयाट!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2024 12:47 PM2024-09-27T12:47:06+5:302024-09-27T12:50:09+5:30

चीनने बुधवारी शिखराला नाव देण्यावरून नाराजी व्यक्त केली आहे. तसेच, अरुणाचल प्रदेश हा आपल्या जांगनानचा भाग असल्याचे म्हटले आहे.

India has done a great job in Arunachal Pradesh give names of sixth dalai lama to peak in arunachal pradesh China angry | अरुणाचल प्रदेशात भारतानं केलं मोठं काम, चीनला झोंबली मिर्ची; सुरू केला थयथयाट!

अरुणाचल प्रदेशात भारतानं केलं मोठं काम, चीनला झोंबली मिर्ची; सुरू केला थयथयाट!

भारतानेअरुणाचल प्रदेशातील एका शिखराला नाव दिल्याने चीनचा चांगलाच तीळपापड झाला आहे. यानंतर आता भारत आणि चीन यांच्यातील टेन्शन पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे.  खरे तर, भारताने अरुणाचल प्रदेशातील एका शिखराला सहावे दलाई लामा त्सांगयांग ग्यात्सो यांचे नाव देण्याचा निर्णय घेतला आहे. भारताच्या या निर्णयाने चीनला चांगलीच मिर्ची लागली असून याला विरोध करत त्याने या भागावर पुन्हा एकदा आपला दावा सांगितला आहे. चीनने बुधवारी शिखराला नाव देण्यावरून नाराजी व्यक्त केली आहे. तसेच, अरुणाचल प्रदेश हा आपल्या जांगनानचा भाग असल्याचे म्हटले आहे.

सहाव्या दलाई लामांचेच नाव का देण्यात आले? -
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनियरिंग अँड ॲडव्हेंचर स्पोर्ट्सच्या (NIMS) टीमने अरुणाचल प्रदेशातील 20,942 फूट उंच असलेल्या आणि नाव नसलेल्या शिखरावर यशस्वी चढाई केली. यानंतर संघाने या शिखराला सहावे दलाई लामा त्सांगयांग ग्यात्सो यांचे नाव देण्याचा निर्णय घेतला आहे. 

एनआयएमएस (NIMS) संरक्षण मंत्रालयाअंतर्गत कार्य करते आणि अरुणाचल प्रदेशातील दिरांगमध्ये स्थित आहे. शिखराचे नामकरण करण्यासंदर्भात संरक्षण मंत्रालयाने काढलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, सहाव्या दलाई लामा यांचे नाव शिखराला देणे, ही त्यांचे योगदान आणि बुद्धीला आदरांजली आहे. सहावे दलाई लामा, त्सांगयांग ग्यात्सो यांचा जन्म 1682 मध्ये मोन तवांग प्रदेशात झाला होता.

काय म्हणाला चीन -
यासंदर्भात प्रश्न विचारला असता, चिनी परराष्ट्रमंत्रालयाचे प्रवक्ते लिन जियान पत्रकारांसोबत संवाद साधताना म्हणाले, ‘‘आपण जो प्रश्न केला आहे, त्यासंदर्भात मला माहिती नाही. व्यापक दृष्टीने बोलायचे झाल्यास, जांगनानचा प्रदेश हा चीनचा प्रदेश आहे आणि भारताने चीनच्या भूभागात तथाकथित अरुणाचल प्रदेश स्थापन करणे बेकायदेशीर आणि अवैध आहे."

Web Title: India has done a great job in Arunachal Pradesh give names of sixth dalai lama to peak in arunachal pradesh China angry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.