चीनच्या तीन पत्रकारांची भारताने केली हकालपट्टी
By admin | Published: July 24, 2016 12:37 PM2016-07-24T12:37:05+5:302016-07-24T12:37:05+5:30
शिन्हुआ या चीनी वृत्तसंस्थेत काम करणा-या तीन चिनी पत्रकारांना भारत सरकारने देश सोडून जाण्यास सांगितले आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २४ - शिन्हुआ या चीनी वृत्तसंस्थेत काम करणा-या तीन चिनी पत्रकारांना भारत सरकारने देश सोडून जाण्यास सांगितले आहे. तिघांच्या हालाचालींबद्दल गुप्तचर यंत्रणांनी चिंता व्यक्त केल्यानंतर सरकारने या तिघांना देश सोडून जाण्यास सांगितले. या तिघांमध्ये शिन्हुआचे दिल्लीतील ब्युरो चीफ आणि मुंबईतील लु तांग आणि सी यॉंगगँग यांचा समावेश आहे.
३१ जुलैपर्यंत या तिघांना देश सोडण्यास सांगितलं आहे. भारताने प्रथमच अशा पद्धतीने चिनी पत्रकारांबद्दल निर्णय घेतला. हे तिन्ही पत्रकार वेगवेगळया नावांनी प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे हे पाऊल उचलल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. वु व्हिसाची मुदत वाढवून मागच्या सहावर्षांपासून भारतात रहात होते.
त्यांच्या दोन सहका-यांनाही व्हिसाची मुदत वाढवून दिली होती. पण त्यांच्या या कृत्यांमुळे त्यांचा व्हिसा रद्द करण्यात आला. शिन्हुाआ ही चीन सरकारची अधिकृत वृत्तसंस्था आहे. या वृत्तसंस्थेचा अध्यक्ष कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायनाच्या केंद्रीय समितीचा सदस्य असतो.