ब्रिक्स परिषदेत भारताला जवळच्या मित्रानेच दिला 'दगा'
By admin | Published: October 18, 2016 12:16 PM2016-10-18T12:16:06+5:302016-10-18T12:16:06+5:30
ब्रिक्स परिषदेचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला. या परिषदेत सर्व ब्रिक्स सदस्यांनी दहशतवादा विरुद्ध एकत्र लढण्याचा संकल्प जाहीर केला असला तरी...
Next
ऑनलाइन लोकमत
नवीदिल्ली, दि. १८ - गोव्यात नुकत्याच झालेल्या ब्रिक्स परिषदेचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला. या परिषदेत सर्व ब्रिक्स सदस्यांनी दहशतवादा विरुद्ध एकत्र लढण्याचा संकल्प जाहीर केला असला तरी, भारताला अपेक्षित असलेले महत्वाचे निर्णय होऊ शकलेले नाहीत. या जाहीरनाम्यामध्ये जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तय्यबा या पाकिस्तान पुरस्कृत अतिरेकी संघटनांचा समावेश करण्याच्या भारताच्या प्रयत्नात चीनने खोडा घातला.
धक्कादायक म्हणजे चीनला यामध्ये भारताचा जवळचा मित्र असलेल्या रशियाने साथ दिली. पाकिस्तानातून भारता विरोधात ज्या दहशतवादी कारवाया सुरु असतात त्यावर रशियाने आपली बाजू लावून धरणे भारताला अपेक्षित होते. पण भारताच्या सुरक्षेच्या विषयावर मौन बाळगून रशियाने एकप्रकारे चीनला साथ दिली.
त्याआधी रशियाने दहशतवाद विरोधाच्या नावाखाली पाकिस्तानबरोबर केलेला संयुक्त युद्ध सरावही भारताला खटकला केला. ब्रिक्स परिषदेच्या आधी भारताने रशियाबरोबर संरक्षणाक्षेत्राशी संबंधित हजारो कोटींचे महत्वपूर्ण खरेदी करार केले. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रशियाला भारताचा जवळचा मित्रही म्हटले होते. पण भारताचा हा जवळचा मित्र संरक्षणा सारख्या महत्वाच्या विषयावर विरोधकाला साथ देत आहे.