भारताने उरी हल्ल्याचे पुरावे दिले पाकिस्तानकडे, कारवाई करण्याची केली मागणी

By Admin | Published: September 27, 2016 08:56 PM2016-09-27T20:56:00+5:302016-09-27T20:56:00+5:30

उरी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने पाकिस्तानचे भारतातील उच्चायुक्त अब्दुल बासीत यांना समन्स बजावले. उरी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या उच्चायुक्तांना समन्स बजावल्याची ही दुसरी वेळ आहे.

India has given evidence of Uri attack to Pakistan, demanding action | भारताने उरी हल्ल्याचे पुरावे दिले पाकिस्तानकडे, कारवाई करण्याची केली मागणी

भारताने उरी हल्ल्याचे पुरावे दिले पाकिस्तानकडे, कारवाई करण्याची केली मागणी

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २७ - काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेजवळच्या उरी सेक्टरमध्ये सैन्य तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सैन्य दलाचे १९ जवान शहीद झाले. हा हल्ला पाकिस्ताननेच केला असल्याचे पुरावे आज भारताने पाकिस्तानकडे सुपूर्त केले आहेत. या हल्ल्यामुळे देशभर दु:खाची छाया आणि आक्रोशाचे वातावरण आहे. उरी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने पाकिस्तानचे भारतातील उच्चायुक्त अब्दुल बासीत यांना समन्स बजावले. उरी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या उच्चायुक्तांना समन्स बजावल्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी २२ सप्टेंबररोजी जयशंकर यांनी बासीत यांना समन्स बजावत दहशतवाद्यांकडे आढळलेल्या जीपीएस प्रणाली, कपडे, शस्त्रास्त्र यांची माहिती दिली होती.

भारताचे परराष्ट्र सचिव एस जयशंकर यांनी अब्दुल बासीत यांना उरी हल्ल्यातील काही पुरावेदेखील देण्यात आले असून या पुराव्यांमधून दहशतवादी हे पाकिस्तानमधूनच आल्याचे स्पष्ट होते. या दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करण्याचा मार्ग दाखवणा-या दोघा जणांची नावही पाकिस्तानला देण्यात आली आहेत.
दहशतवाद्यांना मार्ग दाखवणा-या दोन तरुणांची नाव पाकिस्तानला देण्यात आली. फैझल हुसैन (२०) आणि यासीन खुर्शीद (१९) अशी या दोघांची नाव आहेत. तसेच उरीत हल्ला करणा-या एका दहशतावाद्याची ओळख पटली असून हाफीज अहमद असे या दहशतवाद्याचे नाव आहे. तोदेखील पाकव्याप्त काश्मीर निवासी असल्याचे निष्पन्न झाले आहे. ही सर्व माहिती बासीत यांना देण्यात आली आहे.

दरम्यान, उरी इथला दहशतवादी हल्ला शीख व मुस्लीमांमध्ये तेढ वाढावी म्हणून भारताने घडवल्याचा हास्यास्पद जावईशोध पाकिस्तानच्या प्रसारमाध्यमांनी लावला आहे. काश्मिरमधल्या मुस्लीमांच्या लढ्याला शीखांनी पाठिंबा देऊ नये म्हणून शीखांचं प्राबल्य असलेल्या उरीची खोट्या दहशतवादी हल्ल्यासाठी निवड करण्यात आल्याचे सुरक्षा अधिकाऱ्यांच्या हवाल्याने पाकिस्तानी वृत्तपत्राने दिले आहे.

 

 

Web Title: India has given evidence of Uri attack to Pakistan, demanding action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.