भारतात 'या' राज्यात होतात सर्वाधिक आंतरजातीय विवाह..
By admin | Published: May 14, 2016 10:55 AM2016-05-14T10:55:14+5:302016-05-14T10:59:00+5:30
भारतात आंतरजातीय विवाहांचे प्रमाण अवघे ५ टक्क आहे मात्र त्यापैकी ५५ टक्के आंतरजातीय लग्न ही मिझोरममध्ये होतात.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १४ - नुकताच प्रदर्शित झालेला 'सैराट' हा चित्रपट सध्या बराच गाजत असून त्यामध्ये मांडण्यात आलेल्या आंतरजातीय विवाहाच्या मुद्यावरूनही बरीच चर्चा सुरू झाली आहे. आपल्या देशभरात आंतरजातीय विवाह करणा-यांना पटकन स्वीकारलं जात नाही. जातीच्या अभिमानापायी कित्येक पालकांनी आपल्या पोटच्या गोळ्याचीच हत्या केल्याच्या 'ऑनर किलींग'च्या घटनाही ऐकल्या आहेत. देशात आंतरजातीय विवाह स्वीकारले जात नसले तरी आपल्याच देशात असं एक राज्य आहे जिथे सर्वात जास्त म्हणजे ५५ टक्के आंतराजातीय विवाह होतात. आणि ते राज्य आहे मिझोरम...
'इंडियन ह्यूमन डेव्हलपमेंट'ने केलेल्या या सर्व्हेमध्ये भारतातील 33 राज्यांसह तसंच केंद्रशासित प्रदेशांमधील एकूण ४१ हजार ५५४ कुटुंबाचा समावेश करण्यात आला होता.नॅशनल कौन्सिल ऑफ अप्लाईड इकॉनॉमिक रिसर्चच्या (एनसीएईआर) सर्वेक्षणानुसार भारत फक्त ५ टक्के आंतरजातीय विवाह होतात, मात्र त्यापैकी सर्वात जास्त आंतरजातीय विवाह मोझारममध्ये होतात. भारतासारख्या बहुधर्मीय देशात ९५ टक्के लग्न ही स्वजातीतच केली जातात, आंतरजातीय लग्नांचे प्रमाण अगदी नगण्य आहे. पण मिझोरम हे राज्य त्याला अपवाद आहे. मिझोरममील बहुसंख्य नागरिक हे ख्रिश्चनधर्मीय असून तिथे तब्बल ५५ टक्के लग्न ही आंतरजातीय लग्न होतात. तर या क्रमवारीत दुस-या क्रमांकावर आहे मेघालय हे राज्य, जेथे आंतरजातीय विवाहांचे प्रमाण आहे ४६ टक्के आणि ३८ टक्क्यांसह सिक्कीम तिसऱ्या स्थानावर आहे. ३५ टक्के आंतरजातीय विवाहांसह मुस्लिमबहुल जम्मू-काश्मीर हे चौथ्या तर गुजरात पाचव्या स्थआनावर आहे, आंतरजातीय लग्नाचे प्रमाण १३ टक्के आहे.
मध्य प्रदेशात होतात सर्वाधिक स्वजातीय विवाह