भारताला एका वर्षात २४ हजार कोटींचा ऑनलाइन गंडा
By admin | Published: July 6, 2014 01:56 PM2014-07-06T13:56:07+5:302014-07-06T19:51:28+5:30
देशात २०१३ या वर्षात तब्बल २४ हजार ६३० कोटी रुपयांची ऑनलाइन फसवणूक झाल्याची धक्कादायक माहिती दिल्लीतील न्यायालयमोर सादर करण्यात आली आहे.
Next
ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. ६ - भारतात इंटरनेट युजर्सचे प्रमाण वाढत असतानाच ऑनलाइन भामट्यांचा गल्लाही आता कोट्यावधींची उड्डाणे घेत आहे. देशात २०१३ या वर्षात तब्बल २४ हजार ६३० कोटी रुपयांची ऑनलाइन फसवणूक झाल्याची धक्कादायक माहिती दिल्लीतील न्यायालयमोर सादर करण्यात आली आहे.
दिल्लीतील न्यायालयाने फौजदारी गुन्ह्यांसदर्भातील एक अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. यानंतर दिल्लीतील विधी सेवा प्राधिकरणाने अतिरिक्त सत्र न्यायाधीशांसमोर अहवाल सादर केला आहे. या अहवालात प्राधिकरणाने देशात इंटरनेटच्या आधारे तब्बल २४, ६३० कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे म्हटले आहे. यात देशात ऑनलाइन फसवणुकीची किती गुन्हे दाखल झाले याविषयी माहिती देण्यात आलेली नाही. मात्र फसवणूकीची रक्कम नेटीझन्सचा निष्काळजीपणा समोर आणणारी आहे.