जगात सर्वाधिक ९७ काेटी मतदार भारतात; निवडणूक आयोगाची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2024 09:20 AM2024-02-10T09:20:33+5:302024-02-10T09:21:09+5:30

आगामी निवडणुकीत हे लोक मतदानाचा हक्क बजावू शकतील.

India has the highest number of 97 crore voters in the world; Election Commission information | जगात सर्वाधिक ९७ काेटी मतदार भारतात; निवडणूक आयोगाची माहिती

जगात सर्वाधिक ९७ काेटी मतदार भारतात; निवडणूक आयोगाची माहिती

नवी दिल्ली : लोकसभेच्या आगामी निवडणुकीत देशातील ९६.८८ कोटी नागरिक मतदान करण्यासाठी पात्र ठरविण्यात आले आहेत. आता भारतात जगातील सर्वाधिक मतदार आहेत. लोकसभेच्या आगामी निवडणुकीत हे लोक मतदानाचा हक्क बजावू शकतील.
निवडणूक आयोगाने यासंदर्भात माहिती दिली.

१.६५ कोटी नावे यादीतून वगळली
मतदारयाद्यांची फेरतपासणी करण्यात आली. अनेक कारणांमुळे १.६५ कोटी नावे मतदारयादीतून वगळली.
त्यामध्ये ६७.८२ लाख मृत व्यक्ती, दुसरीकडे राहायला गेलेले ७५.११ लाख लोक, २२.०५ डुप्लिकेट मतदार यांचा समावेश आहे.

२.६३ कोटी नव्या मतदारांची नोंद
n२.६३ कोटी नवे मतदार मतदारयादीमध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत. त्यात १.४१ कोटी महिला आहेत. तर १.२२ कोटी पुरूष आहे.
nनव्या महिला मतदारांची संख्या पुरुष मतदारांपेक्षा १५ टक्क्यांहून अधिक आहे. ८८.३५ लाख दिव्यांगांचा समावेश आहे.

१.८५
कोटी मतदार ८० वर्षांहून अधिक वयोमानाचे आहेत.
१७
वर्षांहून अधिक पण १८ वर्षे
पूर्ण न झालेल्या
१०.६४ लाख लोकांनी
केले मतदार होण्यासाठी अर्ज केले आहेत.
२.३८
लाख लोक आहेत १०० वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे आहेत.
१५.३०
कोटी उत्तर प्रदेशात मतदार. सर्व राज्यांमधील सर्वाधिक मतदार असलेले राज्य आहे.

 

Web Title: India has the highest number of 97 crore voters in the world; Election Commission information

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.