चीनला प्रत्युत्तर देण्यासाठी भारताकडे तीन पर्याय; मोदी सरकार नेमकं काय करणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2020 06:36 AM2020-06-19T06:36:41+5:302020-06-19T06:37:05+5:30

भारताकडे मर्यादित पर्याय आहेत. त्यापुढे जाणं शक्य दिसत नाही, असं तज्ज्ञांचं मत आहे.

India has three options to respond to China | चीनला प्रत्युत्तर देण्यासाठी भारताकडे तीन पर्याय; मोदी सरकार नेमकं काय करणार?

चीनला प्रत्युत्तर देण्यासाठी भारताकडे तीन पर्याय; मोदी सरकार नेमकं काय करणार?

Next

- शीलेश शर्मा

नवी दिल्ली: चीनला प्रत्युत्तर देण्याबद्दल तज्ज्ञांचं मत वेगळं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की, भारताकडे मर्यादित पर्याय आहेत. त्यापुढे जाणं शक्य दिसत नाही. माजी सैन्य अधिकारी अजय शुक्ला यांचं म्हणणं आहे की, भारतापुढे तीन पर्याय आहेत. एक म्हणजे थेट हल्ला करून पाकिस्तानप्रमाणे त्यांना धडा शिकवावा. मात्र यात धोका आहे. कारण चीन हा पाकिस्तान नाही. ते प्रत्युत्तरादाखल कारवाई करतील. त्यात सैन्याची हानी होऊ शकते. दुसरा पर्याय एलएसीला लागून असलेल्या भागावर ताबा मिळवणं. या भागावर चीन आपला दावा करत आहे. पण हेही सोपं नाही. शेवटचा पर्याय आहे चीनवर आर्थिक हल्ला करणं. २०१९ च्या आकडेवारीनुसार, भारत व चीन यांच्यात मोठं व्यापार असंतुलन आहे. २०१९ मध्ये भारताचा व्यापारातील तोटा ५६.८ बिलियन अमेरिकी डॉलर होता. चीनसाठी भारत एक मोठी बाजारपेठ आहे. ही बाजारपेठ चीन आपल्या हातून जाऊ देणार नाही.
 

Web Title: India has three options to respond to China

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.