जेव्हा कोणी हिंदुत्वाशी नातं तोडतो, तेव्हा तो भारताशीही नातं तोडतो - मोहन भागवत

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2018 11:32 AM2018-01-22T11:32:40+5:302018-01-22T11:35:47+5:30

भारत एक हिंदू राष्ट्र असल्याचा पुनरुच्चार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी केला आहे. तसंच जेव्हा कोणी हिंदुत्वाशी नातं तोडतो, तेव्हा तो भारताशीही नातं तोडतो असंही मोहन भागवत यांनी म्हटलं आहे.

India is a Hindu Rashtra says Mohan Bhagwat | जेव्हा कोणी हिंदुत्वाशी नातं तोडतो, तेव्हा तो भारताशीही नातं तोडतो - मोहन भागवत

जेव्हा कोणी हिंदुत्वाशी नातं तोडतो, तेव्हा तो भारताशीही नातं तोडतो - मोहन भागवत

googlenewsNext

गुवाहाटी - भारत एक हिंदू राष्ट्र असल्याचा पुनरुच्चार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी केला आहे. तसंच जेव्हा कोणी हिंदुत्वाशी नातं तोडतो, तेव्हा तो भारताशीही नातं तोडतो असंही मोहन भागवत यांनी म्हटलं आहे. खानपाडा पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या मैदानात पार पडलेल्या कार्यक्रमात मोहन भागवत बोलत होते. मोहन भागवत यांना ऐकण्यासाठी 50 हजाराहून जास्त लोकांनी गर्दी केली होती. मोहन भागवत बोलले की, 'भारत आता नला आपला शत्रू मानत नाही, पण पाकिस्तान भारताकडे मैत्रीच्या नजरेतून पाहण्यात अपयशी ठरला आहे'. 'हडप्पा आणि मोहेंजदाडो सध्या पाकिस्तानात आहे. ते भारताचा घटक आहेत, पण पाकिस्तान त्यांची दखल घेऊ इच्छित नाही. पाकिस्तान हिंदुत्व स्विकारु इच्छित नसल्या कारणानेच एक वेगळा देश आहे', असंही ते बोलले आहेत. 

यावेळी मोहन भागवत यांनी बांगलादेशवरही टीका केली. 'बांगलादेशमधील लोक बांगला भाषा बोलत असतानाही तो एक वेगळा देश कशासाठी ? कारण त्या देशाला हिंदुत्वासोबत जुळवून घेण्याची इच्छा नाही', अशी टीका मोहन भागवत यांनी यावेळी केली. मोहन भागवत यांनी सांगितल्यानुसार, हिंदुत्वानेच भारताला एकजूट ठेवलं आहे. इतक्या भाषा, धर्म, परंपरा आणि जीवनशैली असतानाही हिंदुत्वाने सर्वांना एकत्र ठेवलं आहे. पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, 'हिंदुत्व विविधतेचा स्विकार करतो, विभाजनाचं नाही. यामुळेच भारत एक हिंदू राष्ट्र आहे'.

उत्तर आसाम क्षेत्राकडून ही परिषद आयोजित करण्यात आली होती. आसामच्या मुख्यमंत्रांसहित राज्यातील अनेक मंत्र्यांनी या परिषदेला हजेरी लावली. यावर बोलताना मोहन भागवत यांनी ही परिषद आमची ताकद दाखवण्यासाठी आयोजित केली नसून लोकांना हिंदुत्वाचं महत्व समजावं यासाठी आयोजित केली असल्याचं सांगितलं. 'भारताने नवीन जागा मिळवण्यासाठी ताकदवान होण्याची गरज नाही, पण मनं जिंकण्यासाठी ताकदवान व्हावं', असं मोहन भागवत बोलले आहेत. हिंदुत्व सर्व तत्वज्ञानांचा सिव्कार करतं, आणि जो कोणी यात सामील होतं त्यांचा स्विकार करतो', असं त्यांनी म्हटलं.

Web Title: India is a Hindu Rashtra says Mohan Bhagwat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.