India: भारताचं नामकरण इंडिया कसं झालं? असा आहे इतिहास 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2023 05:11 PM2023-07-27T17:11:49+5:302023-07-27T17:13:09+5:30

India: केंद्रातील मोदी सरकारविरोधात विरोधी पक्षांनी उभ्या केलेल्या आघाडीला INDIA असं नामकरण केल्याने इंडिया हे नाव पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे.

India: How was Bharat named India? Such is history | India: भारताचं नामकरण इंडिया कसं झालं? असा आहे इतिहास 

India: भारताचं नामकरण इंडिया कसं झालं? असा आहे इतिहास 

googlenewsNext

 

केंद्रातील मोदी सरकारविरोधात विरोधी पक्षांनी उभ्या केलेल्या आघाडीला INDIA असं नामकरण केल्याने इंडिया हे नाव पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. याआधी २०२०मध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिकासुद्धा दाखल करण्यात आली होती. यामध्ये घटनेमध्ये नोंद असलेलं देशाचं इंडिया इज भारत हे बदलून केवळ भारत करावं, अशी मागणी करण्यात आली होती. इंडिया हे नाव इंडिका या ग्रीक शब्दावरून आलं आहे. तसेच ते हटवलं पाहिजे, असा दावा करण्यात आला होता. मात्र सुप्रीम कोर्टाने ही याचिका फेटाळली होती.

असं समजलं जातं की, इंग्रज किंवा इतर युरोपिय भाषा बोलणाऱ्यांना नेहमीच पूर्वेकडील देशांची नावे उच्चारण्यात अडचण येत असे. त्यामुळे ते आपल्या सोईनुसार नावांमध्ये बदल करत असत. तसेच हे युरोपियन प्रवासी जास्त फिरायचे. त्यामुळे त्यांनी दिलेली नावं अधिक प्रचलित झाली.

प्राचीन काळापासूनच भारत या देशाला अनेक नावांनी संबोधलं जात असे. त्यात जंबूद्वीप, भारतखंड, हिमवर्ष, अजनाभवर्ष, भारतवर्ष, आर्यावर्त, हिंद, हिंदुस्तान, भारत, इंडिया यांचा समावेश आहे. त्यात भारत हे नाव सर्वाधिक लोकप्रिय झालेलं आहे. मात्र भारताच्या नावावरही अनेक मतभेद आहेत. वेगवेगळ्या काळात इतिहासकारांनी आणि प्राचीन ग्रंथात याबाबत लिहिलं आहे. विष्णुपुराणामधील उल्लेखानुसार समुद्रेच्या उत्तरेपासून हिमालयाच्या दक्षिणेमध्ये जो देश आहे तोच भारत आहे आणि येथे राहणारे भारतीय. याचा अर्थ हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंतच्या भूमिला भरत म्हटलं जातं.

तसेच भारत हे नाव भरत या नावावरून पडलं. मात्र पौराणिक काळामध्ये भरत नावाचे अनेक महापुरुष होऊन गेले आहेत. महाभारतातील उल्लेखानुसार हस्तिनापूरचे राजे दुष्यंत आणि शकुंतला यांच्या पुत्राचं नाव भरत होतं. भरत चक्रवर्ती सम्राट होते. त्याच्या नावावरूनच या भूमीला भारतवर्ष हे नाव पडलं. संस्कृतमध्ये वर्ष याचा अर्थ परिसर असा होतो. तसेच बहुतांश इतिहासकार आणि भाषाशास्त्रज्ञांच्या मते यांच्याच नावावरून भारत हे नाव पडलं.

जेव्हा इंग्रज भारतात आले, तेव्हा या देशाला हिंदुस्तान म्हणून ओळखलं जात होतं. मात्र हिंदुस्तान म्हणणं ब्रिटिशांना जड जात होतं. त्याचवेळी ब्रिटिशांना लॅटिन भाषेत इंडिया म्हणतात हे समजलं. तेव्हा त्यांनीही या देशाला इंडिया असं संबोधित करण्यास सुरुवात केली. या मतप्रवाहाबाबतही अनेक विवाद आहे. मात्र बहुतांस आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताल इंडिया म्हणून संबोधले जात आहे.  

Web Title: India: How was Bharat named India? Such is history

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.